scholarship esakal
नाशिक

महाज्‍योतीतर्फे 100 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

अरूण मलाणी

नाशिक : ओबीसी (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्‍य शासनाकडून (State Government) परदेशात शिक्षणासाठी (Abroad studies scholership) शिष्यवृत्ती दिली जाते. शंभर विद्यार्थ्यांना यंदा ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. महात्‍मा जोतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्‍था (महाज्‍योती) यांच्‍या सभेत हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केवळ दहा विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जात. (Mahajyoti offers scholarships to 100 students for study abroad nashik news)

ओबीसींच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या कमी होती. त्यामुळे किमान शंभर विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मिळावी, अशी बऱ्याच वर्षांपासून मागणी होती. त्या अनुषंगाने महाज्योती संचालक मंडळाची अध्यक्ष व मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. याप्रसंगी महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, संचालक लक्ष्मण वडले, संचालक डॉ. बबनराव तायवडे, सिद्धार्थ गायकवाड व व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे उपस्थित होते. ओबीसी, व्‍हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीचा प्रश्‍न संचालक मंडळात मांडण्यात आला. या वर्षापासून शंभर ओबीसी, व्‍हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृती देण्याची घोषणा केली.

संपूर्ण संचालक मंडळाने एकमताने मान्यता दिली. त्याचप्रमाणे परदेशात शिकण्यासाठी व परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी दोनशे विद्यार्थ्यांना स्पर्धापूर्व निवासी प्रशिक्षण देण्याचा निर्णयसुद्धा संचालक मंडळाच्या सभेत मंजूर झाला आहे. याशिवाय सभेत चंद्रपूर, अचलपूर, वर्धा, नागपूर, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत महाज्योतीतर्फे प्रत्येकी दोन डिजिटल क्लासरूम व सोबत डिजिटल लायब्ररीसह स्टडीरूम महाज्योतीतर्फे सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. या डिजिटल क्लासरूम, स्टडीरूम शासनाच्या जिल्हा परिषद किंवा पालिकांच्या शासकीय शाळांमधे केल्या जाणार असून, प्रत्येक क्लासरूमसह स्टडीरूमसाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च करण्यास मान्‍यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT