Speaking at the meeting held in the market committee on Sunday, the coordinator of the Farmers' Association retired. Neighbor Gorakh Sant, Adv. Uttamrao Kadam, Kedar Navale etc. esakal
नाशिक

Nashik News: कांदा निर्यातबंदी प्रश्नी लासलगावला जानेवारीत महामेळावा!

स्वाभिमानी शेतकरी, प्रहार जनशक्ती, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत निर्णय.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : कांदा निर्यातबंदी प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, छावा क्रांती संघटनांची येथील बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात रविवारी (ता. २४) बैठक झाली.

तीत जानेवारी महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ३० एकर जागेत राज्यव्यापी महामेळावा घेण्याची घोषणा करण्यात आली व लढा उभारण्याचा निर्धार करण्याची माहिती समविचारी शेतकरी संघटनेचे समन्वयक निवृत्ती गारे-पाटील यांनी दिली. (mahamelava over Onion export ban in Lasalgaon in January Nashik News)

ॲड. उत्तम कदम अध्यक्षस्थानी होते. कांदा निर्यातबंदी निर्णयाला विरोध करत केंद्र सरकारच्या निषेध करण्यात आला. केंद्र सरकारविरोधात तीव्र लढा उभरण्यावर एकमत झाले.

राज्यातील सर्व शेतकरी संघटना वेगवेगळे आंदोलन न करता एकत्र मोठे शेतकरी आंदोलन उभारले पाहिजे, तसेच लोकसभा आणि विधानसभेवर शेतकरी प्रतिनिधी कसे जातील, याकडे लक्ष देण्याची मागणी उत्तम कदम यांनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे-पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन काकडे, छावा क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक गोरख संत, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले, धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चांदोरे, कुबेर जाधव यांनी केंद्र सरकाराच्या या निर्णयाचे निषेध केला.

Nashik Political: जुन्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश! येवल्यातील कार्यकर्त्यांचा ‘जय महाराष्ट्र


तुषार शिरसाठ, गजानन घोटेकर, कैलास कोकाटे, श्रावण नवले, रामदास भुजबळ, दिगंबर दौंडे, मच्छिंद्र जाधव, ऋषिकेश घोलप, जयेश जगताप, दीपक शिंदे, साहिल शेख, सुदाम देशमुख, राजू शिरसाठ, विलास दरगुडे, रवींद्र तळेकर, संजय जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.

अन्यथा मंगळवारपासून उपोषण

कांदा निर्यादबंदी प्रश्नाबाबत वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घडून न दिल्यास मंगळवार (ता. २६)नंतर केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या नाशिक येथील निवासस्थानी किंवा दिल्ली येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा छावा क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक गोरख संत यांनी इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 : शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना..! अखेर ५६ जागा जिंकत शिक्कामोर्तब

Nagpur South Assembly Election 2024 Result: प्रतिष्ठेची लढत भाजपने जिंकली, नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे मोहन मते यांचा विजय

Sports Bulletin 23rd November: पर्थ कसोटीत भारताकडे भक्कम आघाडी ते उद्या आयपीएल २०२५ चा मेगा ऑक्शन रंगणार

Rohit Pawar Won Karjat-Jamkhed Assembly Election 2024 Result Live: रोहित पवारांचा अटीतटीचा विजय; राम शिंदेंना दुसऱ्यांदा दिली मात

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT