maharashtra andhashraddha nirmulan samiti demand to Omit mention of Putrakameshti yadnya from medical curriculum nashik news esakal
नाशिक

Nashik News : वैद्यकीय अभ्यासक्रमातून पुत्र कामेष्टी यज्ञाचा उल्‍लेख वगळा; ‘अंनिस’ची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भारतीय वैद्यकशास्त्र (आयुर्वेद) शाखेच्या पदवी बीएएमएस आणि पदव्युत्तर पदवी (एमएस प्रसूतीशास्त्र, स्त्रीरोग) या अभ्यासक्रमांमध्ये पुत्र कामेष्टी यज्ञ व इच्छित पुत्रप्राप्ती कशी करावी, हे शिकविले जात आहे.

हा उल्‍लेख वगळण्यात यावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आली. यासंदर्भात महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या कुलगुरूंच्या नावे निवेदन दिले आहे. (maharashtra andhashraddha nirmulan samiti demand to Omit mention of Putrakameshti yadnya from medical curriculum nashik news)

अभ्यासक्रमातील संदर्भामुळे गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भधारणा निदान तंत्र कायद्याचा भंग होत आहे. ही बाब भारतीय संविधानाच्या विसंगत असल्‍याचेही नमूद केले आहे.

निवेदनात म्‍हटले आहे, की हा पाठ्यभाग अभ्यासक्रमातून वगळण्याबाबत विद्यापीठाने त्यांच्या वरिष्ठांना तत्काळ अवगत करावे. वास्तविक, पीसीपी एनडीटी कायद्यान्वये निवृत्ती इंदुरीकर यांच्यावर दाखल गुन्हा पुढे चालवावा, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

असे असतानाही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून अद्याप कालबाह्य व अवैज्ञानिक भाग वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकविला जातो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे लोकांचे अज्ञान वाढत असून, ते दैववादाकडे झुकतात. भोंदूगिरीला त्यामुळे बळ मिळत असल्‍याचा दावा निवेदनात केला आहे.

विद्यापीठाने आयुष मंत्रालयाला अभ्यासक्रमातील पाठ्यांश वगळण्याबाबत तत्काळ कळवावे. त्यांच्यामार्फत सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनला कळविले जाईल, आणि अवैज्ञानिक, कालबाह्य भाग अभ्यासक्रमातून वगळला जाईल, अशा प्रकारची तजवीज तत्काळ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, डॉ. सुदेश घोडेराव, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्त्री, जिल्हा प्रधान सचिव नितीन बागूल यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT