Maharashtra Politics Memes esakal
नाशिक

Maharashtra Politics Memes : पवार साहेबांनी नुसती भाकरी फिरवली होती दादांनी तर....सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस...

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Politics Memes : राज्याच्या राजकारणात रविवारी (ता. २) संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी राज्यसरकारमध्ये सामील होत त्यांच्यापैकी नऊ आमदारांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. (maharashtra politics ajit pawar sharad pawar Due to political events memes viral on social media nashik news)

या साऱ्या राजकीय घटनाक्रमामुळे सोशल मीडियावर मिम्स, व्यंगचित्रे, भन्नाट पोस्ट यांचा अक्षरशः पाऊस पडला. सोशल मीडियावर मिम्स, पोस्ट, व्हिडिओ, ट्विट शेअर करत लोकांनी राजकीय परिस्थितीवर आपल्या भावनांना वाट करून दिली. दुपारनंतर सक्रिय झालेला हा सिलसिला रात्री उशिरापर्यंत चालूच होता यातील काही राजकारणावर भाष्य करत हसविणाऱ्या तर काही नेत्यांना व मतदारांना आत्मचिंतन करायला लावणाऱ्या होत्या.

व्हाट्सॲप ग्रुप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यावर भन्नाट पोस्ट आणि व्यंगचित्र यांच्या माध्यमातून राजकारणाचे पडसाद उमटले. मागील पहाटेच्या वेळी झालेला शपथविधी आज पुन्हा दुपारी झाल्याने....'पहाटेच्या झोपमोडनंतर रविवारची दुपारची झोप वाया -- कारणीभूत फक्त दादा'. या पोस्टने मागील आठवणींना उजाळा दिला. तर काहींनी निवडणूक आयोगाला विनंती केली की पुढच्या निवडणुकीपासून आमच्या बोटाला शाई ऐवजी चुना लावण्यात यावा. असे सांगत खेद व्यक्त केला.

काहींनी या राजकारणावर भाष्य करताना म्हटले की, पवार साहेबांनी नुसती भाकरी फिरवली होती... दादांनी तर तवा पालथा करून चुलीत पाणी ओतले आणि पिठाचा डब्बाच पळवला. तर काहींनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची आठवण करून देत त्यांच्या तोंडी 'मी आता राज्यपाल नाही...माझं नाव घ्याल तर टकुऱ्यात दगड घालीन...आणि मुख्यमंत्र्यांच्या मनातील भावना अशा व्यक्त करत मनोरंजन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सासूमुळे वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली अशी वाक्ये टाकत मनमुराद हसवले. काहींनी ब्रेकिंग बातमी म्हणत आता विरोधी पक्ष म्हणून फक्त जनता शिल्लक अशी पोस्ट टाकली.

'ती पहाट' विसरून....आता ही दुपार कायमची आठवणीत राहील अख्ख्या महाराष्ट्राला..; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तक्रार - आम्हाला डायरेक्ट राजभवनात ! ना डोंगर, ना झाडी, ना हाटील..कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचा 'कार्यकर्ते टेन्शनमध्ये' हा व्हिडिओ यांनी जनतेची चांगलीच करमणूक केली. तर काहींनी मतदारांची भूमिका आता काय आणि कशी ठेवायची यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

वर्षभर महाराष्ट्राने ऐकलंय.."माझा बाप चोरला..." आता यापुढे हेही ऐकायचंय..."माझा पुतण्या चोरला..." अशा ओळींनी स्मित फुलवले. किरीट सोमय्या, अण्णा हजारे अशा अनेकांवर केलेल्या राजकीय पोस्ट फिरतच राहिल्या. अर्थात आजचा दिवस हा राजकारणातील आठवणींचा दिवस राहिला. पार, कट्टे, हॉटेल अशा अनेक ठिकाणी गप्पांचा विषयही राजकारणाचाच पाहायला आणि ऐकायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : विकासकामे न करणाऱ्यांकडूनच टीका : शंभूराज देसाई; सुपने येथे प्रचार सभा, टीका न करता कामे करत राहण्याचा निर्वाळा

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

The Sabarmati Report : 12th Fail फेम विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'ची जादू पडली फिकी ; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

SCROLL FOR NEXT