Chhagan Bhujbal : राज्याच्या सत्ता समीकरणात घडलेल्या घडामोडीमुळे सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या गेल्यामुळे स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे. राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
त्यामुळे नांदगाव तालुक्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले कांदे -भुजबळ हे दोन्ही नेते आता एकाच सरकारचे घटक झाल्यामुळे कोण कोणाशी जुळवून घेणार हे बघावे लागणार आहे.
मात्र निवडणुकांसह पक्षाची भूमिका मांडताना ज्यांच्या विरोधात आपण काम केले आज तेच सोबत आल्याने सर्वसामान्यांना तोंड देण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. (maharashtra politics chhagan bhujbal suhas kande are in same govt nashik news)
राज्याच्या राजकारणात आज चांगलाच भूकंप झाला. पूर्वी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी पक्षात फाटाफूट झालेली दिसली. शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी गटाचे आमदार सहभागी झाल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले.
मात्र असे होत असताना पक्षासाठी नेत्यासाठी काम करणारा कार्यकर्ता मात्र द्विधा मनःस्थितीत दिसून आला. सत्तेची समीकरणे अथवा गणिते जुळवण्यासाठी युती सरकारने राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने स्थानिक पातळीवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.
नांदगाव तालुक्यात शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांचे वडील राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यातील वैर जगजाहीर आहे. जिल्हा नियोजन समितीतील विकास कामे वाटपावरून कांदे - भुजबळांचा झालेला वाद राज्याने पाहिला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तर स्थानिक मनमाड आणि नांदगाव बाजार समितीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते परस्परविरुद्ध कामाला लागले होते.
नांदगाव बाजार समिती कांदे यांना राखता आली तर मनमाड बाजार समिती धात्रक भुजबळांनी राखत आपले वर्चस्व कायम केले. मात्र आता याच कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेत सरकारमध्ये सहभागी झाले आहे. त्यामुळे परस्पर विरोधी असलेले दोन्ही नेते आता एकाच सरकारचे घटक झाल्यामुळे हा विरोध निवळेल की कायम राहिली असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
आमदार कांदे यांनी केलेला विरोध भुजबळांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. तर भुजबळांनी केलेला विरोध कांदे विसरलेले नाही. अनेकदा दोन्ही नेत्यांनी जाहीर भाषणात बोलून दाखवले आहे. मात्र आजच्या घडामोडीमुळे या नेत्यांची भूमिका काय असणार याची उत्सुकता नागरिकांना लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.