sanjay raut sakal media
नाशिक

महाराष्ट्र तुळशी वृंदावन; इथे गांजा पिकत नाही - संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : महाराष्ट्र हा तुळशी वृंदावन असून इथे गांजा पिकू शकत नाही, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मविआ सरकार हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील उत्कृष्ट रित्या चालू असून हे देशातील सर्वोत्तम सरकार असल्याचा दावा देखील त्यांनी केलं आहे. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

तसेच राज्यात झालेल्या एनसीबी कारवाया या राजकीय आकसापोटी झाल्या असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलंय. हे सरकार ईडी, सीबीआय, आयटी, एनसीबी इथे काहीही बिघडवू शकत नाहीत. कुणी कितीही फडफड केली तरी सरकारला काहीही फरक पडत नाही. यातूनही सरकार पडत नसेल तर आता आर्मीला बोलवा, असं खोचक विधान त्यांनी केलंय. तसेच आजवरच्या इतिहासात अशी कारवाई झालेली पाहिली नाही आणि लवकरच सत्य काय आहे ते समोर येईल, असंही त्यांनी म्हटलंय. नवाब मलिक असो वा मविआ सरकारमधील नेत्यांना ज्या धमक्या येत आहेत, त्या धमक्या परदेशातून येत आहेत, त्यांचे परदेशात हितसंबंध आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.

नवाब मलिकांनी चुकीचे फोटो प्रसिद्ध केले असतील तर ते न्यायालयात सिद्ध होतील. एनसीबीच्या कारवाया राजकीय आकसापोटी झाल्या असून चुकीच्या कारवाया झाल्या असल्याचा त्यांचा आरोप आहे. अशा प्रकारची कारवाई मी देखील आजवर कधी पाहिली नाही. काहीतरी काळेबेरे असून लोकांनी विश्वास ठेवलाय. मात्र, नवाब मलिकांनी जे दावे केलेत ते तरी खोडून काढावे लागतीलच, हा विषय न्यायालयात आहे, न्यायालय ठरवेल, असं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT