agriculture news esakal
नाशिक

Agriculture News : फळबाग व फुलबाग लागवडीसाठी 3 वर्षात 100 टक्के अनुदान

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग, फुलबागा आणि औषधी वृक्ष लागवड करण्याकरिता शेतकऱ्यांना ३ वर्षात शंभर टक्के अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचा या योजनेचा उद्देश असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले. (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Nashik latest marathi news)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सन २०२२-२३ मध्ये नाशिक विभागात १० हजार ४५० हेक्टर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्ररेषेखालील लाभार्थी, भू-सुधार योजानेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजना २००८ नुसार अल्प भूधारक व सिमांत शेतकरी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वननिवासी अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती या पैकी कोणत्याही एका अटींची पूर्तता करणारा लाभार्थी २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेऊ शकणार आहे.

सर्व फळपिके व फुलशेती लागवडीचा कालावधी एक जून ते ३१ डिसेंबर पर्यंत राहील. अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. फळपिकाची फुलबागांची लागवड करून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT