नाशिक : येथील गांधीनगरच्या हवाई दलाच्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलमध्ये (कँट्स) सुमारे सव्वा लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या मेजर हिमांशू मिश्रा आणि ज्युनिअर गॅरिसन इंजिनियर मिलिंद वाडिले यांना न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. सदरची कारवाई केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता.१३) रात्री केली होती. (Major Mishra Vadile sent to judicial custody in CATS bribery case Nashik Latest Crime News)
नाशिक- पुणे रोडवरील गांधीनगर येथे कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुल (कॅट्स) आहे. ठेकेदाराच्या तक्रारीनुसार, मेजर मिश्रा व वाडिले यांनी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. त्यासंदर्भात ठेकेदाराने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, पथकाने गुरुवारी (ता.१३) रात्री सापळा रचला होता. ठेकेदाराकडून मेजर मिश्रा व वाडिले यांनी १ लाख २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्यावेळी दबा धरून असलेल्या सीबीआयच्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक केली होती.
दरम्यान, दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता.१४) नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयात सीबीआयच्या वतीने युक्तिवाद करताना त्यांच्या निवासाची झडतीची मागणी करीत कोठडीची मागणी केली. तर अधिकाऱ्यांच्या वतीने युक्तिवाद करताना बचावपक्षाने अधिकाऱ्यांनी लाचेची रक्कम मागितलेली नाही. उलट संबंधित ठेकेदाराच्या कामाबाबत वाद असल्याचे न्यायालयात सांगत, अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक अडकविण्यात आल्याचे सांगितले. याप्रकरणी न्यायालयाने दोघा अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.