make a great career in engineering field nashik marathi news 
नाशिक

अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरच्या अमर्याद संधी; जाणून घ्या पर्याय

अरुण मलाणी

Career After 12th : बारावी नंतर करिअरच्या शेकडो संधी उपलब्ध आहेत, कुठल्‍याही उत्‍पादनाच्‍या निर्मितीप्रक्रियेत अभियंत्‍यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. त्‍यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व आजही टिकून आहे. यापूर्वी प्रचलित असलेल्‍या सिव्हिल, मॅकेनिकल, कॉम्प्युटर अशा शाखांसोबत आधुनिक काळाची गरज म्‍हणून ऑरॉनॉटिक्‍स, एअरोस्पेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स अशा शाखांमध्येही अभियांत्रिकी शिक्षणाचे दालन खुले झाले आहे. या शिक्षणातून विद्यार्थ्यांना आपली कल्‍पकता व कुशलता दाखविण्यासाठी पुरेपूर वाव आहे. 

अभियांत्रिकी शाखेतील पदवी शिक्षणाच्‍या प्रथम वर्षाच्‍या प्रवेशासाठी सीईटी सेलतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचा पर्याय खुला असतो. सोबत काही अटींची पूर्तता केलेली असणे आवश्यक असते. सीईटी परीक्षांच्या गुणांवर शाखा निहाय प्रवेश दिला जातो. त्‍यासाठी निकाल जाहीर झाल्‍यानंतर कॅप राउंडची प्रक्रिया पार पडते

अभियांत्रिकीनंतरच्‍या संधी

अभियांत्रिकी शिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांना स्‍वतः प्रकल्‍प साकारायचे असतात. यामुळे त्‍यांना प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त होत असते. यातून विद्यार्थ्यांना स्‍वतःचे स्‍टार्टअप उभारण्याची संधी असते. शिक्षण घेतलेल्या शाखेशी निगडित व्यवसाय, उद्योग करता येतो. बहु राष्ट्रीय, स्थानिक एमआयडीसी, बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे नोकरीची संधी असते. काही शाखांतून शिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना परदेशातही चांगल्या संधी उपलब्‍ध आहेत. एमपीएससीमार्फत अभियांत्रिकी सेवा परीक्षा घेतली जात असते. या माध्यमातून शासकिय सेवेतही नोकरी करता येते. 

या शाखांमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची संधी

इलेक्ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इन्‍फॉरमेशन टेक्‍नॉलॉजी, प्रोडक्‍शन, एअरोस्पेस, आर्टिफिशियल इंटेलिजेन्‍स अँन्ड डाटा सायन्‍स, ऑटोमेशन अँन्ड रोबोटिक्‍स, इंट्रुमेंटेशन अँन्ड कंट्रोल, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, अॅग्रिकल्‍चरल, ऑटोमोटिव्‍ह, बायोमेडिकल, केमिकल, कॉम्‍प्‍युटर, इलेक्‍ट्रॉनिक्स अँन्ड टेलिकम्युनिकेशन (ई अँन्ड टीसी), ड्राफ्टिंग अँन्ड डिझाइन, मरिन, मॅकेनिकल, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, बी.टेक. बायोटेक्‍नॉलॉजी आदी शाखांमध्ये शिक्षण घेता येऊ शकते. पदवीनंतर पदव्‍युत्तर पदवीचा पर्याय उपलब्‍ध असतो. अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीनंतर एमबीए या व्‍यवस्‍थापनशास्‍त्राचे शिक्षण घेतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT