To repair the Malegaon water channel, the newly constructed road will have to be demolished. esakal
नाशिक

Nashik News : नगरनियोजनाबाबत शहराची अवस्था ‘फाटकी लंगोट अन्‌ डोईवर जिरेटोप’!

प्रमोद सावंत

Nashik News : शहराचा विकासाचा गाडा भरधाव आहे. ५०० कोटींची भुयारी गटार योजना, नदी सुधार आराखडा, तळवाडे ते मालेगाव नुतन जलवाहिनी, शंभर कोटींचे सिमेंट कॉंक्रीट रस्ते, पुल अशी कोट्यवधी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. काही कामे मार्गी लागली, काही सुरु आहेत.

भुयारी गटारसह अन्य कामांच्या निविदा प्रस्तावित आहेत. विविध विकासकामांना निधीही प्राप्त झाला. शहरात प्रवेश करणारे चोहोबाजूचे रस्ते गुळगुळीत अन्‌ प्रमुख रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे झाले. या विकासकामांमध्ये नियोजनाचा अभाव व अनेक त्रुटी आहेत.

प्रमुख रस्ते होत असले, तरी शहरांतर्गत व नवीन वसाहतींची स्थिती बकालच आहे. एकूणच शहराची अवस्था ‘फाटकी लंगोट अन्‌ डोईवर जिरेटोप’ अशी झाली आहे. (malegaon city problem of urban planning nashik news)

पुर्व भागात चार प्रमुख रस्ते वगळता एकही साठफुटी रस्ता नाही. अतिक्रमणाचा भस्मासुर अक्राळविक्राळ झाला आहे. विना परवाना बांधकामे सर्रासपणे सुरु आहेत. कलेक्टरपट्टा भागात एक रस्ता दुसऱ्या रस्त्याला जाऊन मिळत नाही.

अरुंद रस्ते डोकेदुखी आहेत. या भागात रस्ते झाले असले, तरी सांडपाणी व गटारींची समस्या कायम आहे. सोयगाव, नववसाहत व कलेक्टरपट्टा भागात सांडपाणी, शोषखड्डे, मोकळ्या भुखंडांवरील केरकचरा, झाडी अशा अनंत समस्या आहेत.

रमजानपुरा व म्हाळदे शिवारात रुग्णवाहिका व अग्निशामक दलाचे बंब नेताना तारेवरची कसरत करावी लागते. पुर्व भागातील अनेक परिसरांत पहिल्याच पावसात सांडपाणी घरांमध्ये घुसते. सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे.

शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठांसह पुर्व-पश्‍चिम भागात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नाही. महिलांसाठी बाजारपेठेत स्वच्छतागृह नाहीत. वारंवार मागणी होऊनही जागेअभावी स्वच्छतागृह करणे शक्य नाही.

यामुळे महिलांना ‘तया यातना कठीण’ म्हणत वेळ मारुन न्यावी लागते. त्यातून अनेक आजार उद्‌भवतात. सिमेंट कॉंक्रीट रस्ते करताना खालून जाणाऱ्या जलवाहिन्या, नळजोडण्या, चेंबर आदींचा सारासार विचार झालेला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

डीके चौक ते टेहरे चौफुली या रस्त्यावर फुटलेल्या जलवाहिनीतून सोयगाव मराठी शाळेजवळ पाणी वाहते. सामान्यांना ज्या अडचणी लक्षात येतात व त्यावर उपाययोजना सुचतात, त्या प्रशासनाला सुचू नये हेच आश्‍चर्य.

शहरातील जुना महामार्ग, कुसुंबा रस्ता व अन्य सर्व प्रमुख रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरण झाले. भुयारी गटार योजना प्रस्तावित आहे. या योजनेसाठी हे रस्ते फोडावे लागू नयेत हीच अपेक्षा. मनपा प्रशासन त्या दृष्टीने नियोजन केल्याचे सांगत असले, तरी या कामांमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे प्रशासनाचे हसू होते.

लोकप्रतिनिधी, नेते निधी आणतात. त्यातून होणारी विकासकामे, त्यांचे नियोजन व दर्जा याविषयी वारंवार बोंब होत असल्याने कोट्यवधीचा निधी मिळवूनही त्यांना टिकेचे धनी व्हावे लागते. जुना महामार्ग व सटाणा रस्त्याला एकाच बाजूला मुख्य जलवाहिनी आहे. तथापि, दोहो बाजूला नळजोडण्या व नागरी वस्ती आहे.

यामुळे नव्याने तयार झालेला रोड नळजोडणीसाठी खोदल्यास नवल वाटू नये. साठफुटी रस्ता ते सिनेमॅक्स दरम्यानचा सिमेंट रोड नळ जोडणीसाठी खोदण्यात आला. रस्ता खोदण्यासाठीचा शुल्क नळजोडणीत आकारला जातो.

मात्र, रस्ता दुरुस्तीसाठी प्रतिक्षा करावी लागते. सोयगाव कमान ते टेहरे चौफुली सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला. नव्यानेच सुरु झालेल्या या कामाच्या वेळेस तरी प्रशासन योग्य ती खबरदारी घेईल अशी अपेक्षा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT