malegaon esakal
नाशिक

मालेगावचा मृत्युदर घसरला; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील कोरोनाबाधित रुग्ण व रोजच्या बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण (corona virus) एकेरीवर आल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागही कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असताना कोरोना संसर्गाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी अद्यापही काळजी घेणे गरजेचे आहे. (Malegaon-corona-death-rate-dropped-nashik-marathi-news)

कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

कोरोनाची दूर झालेली भीती, स्थानिक डॉक्टरांनी रुग्णांवर आत्मविश्‍वासाने केलेले उपचार, ॲलोपॅथीसह आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचार पद्धतीचा वापर, शहरातील चारशेहून अधिक युनानी डॉक्टरांची सेवा, कोरोना चाचणीचा आग्रह न धरता थेट सुरू झालेले उपचार व पूर्व भागातील अत्यल्प दरातील उपचारांमुळे शहराची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

डायरिया व अन्य साथजन्य आजारांकडे लक्ष देणे गरजेचे

पूर्व भागात जणू काही कोरोनाच नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळेच की काय रमजान काळात सर्वत्र कठोर लाकडाउन असताना शहराचा पूर्व भाग उत्तर महाराष्ट्राचे सर्वांत मोठे खरेदी केंद्र झाला होता. रमजान काळात शहरात उत्तर महाराष्ट्रातून नागरिक खरेदीसाठी आल्याने येथील अर्थकारणालाही चालना मिळाली. यामुळे रमजानचा सण उत्साहात साजरा झाला. कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचा दर घसरला असला तरी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढती संख्या, डायरिया व अन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना संसर्गाच्या उपाययोजना करताना महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डायरिया व अन्य साथजन्य आजारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

चर्चा सर्वत्रच

शहरातील पूर्व भागात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत कोरोनाचा उद्रेक झाला होता. मालेगाव शहर हॉटस्पॉट ठरले होते. या लाटेत दोन माजी महापौर, सहा प्रतिथयश डॉक्टर व पाच प्रमुख धर्मगुरूंसह अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांचा कोरोनाने बळी घेतला. दुसरी लाट पश्‍चिम भाग व ग्रामीण भागातच प्रामुख्याने दिसून आली. पूर्वेकडे दाट लोकवस्ती, सामाजिक अंतराचे पालन न करणे, मास्कचा वापर नाही, सर्व दुकाने व व्यवहारही सुरू तरीदेखील रुग्णसंख्या व मृत्यूचा दर घसरल्याने येथील कोरोनामुक्त वाटचालीची चर्चा सर्वत्रच सुरू आहे. महापालिका क्षेत्रात सध्या फक्त १९९ पॉझिटिव्ह, तर तालुक्यात २८४ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. मालेगावमध्ये रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९५.८४ टक्के आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे ३१७ जणांचा बळी गेला आहे. शहरातील कब्रस्तानाच्या एप्रिल-मेमधील तीन वर्षांतील तुलनात्मक नोंदी मृत्युदर घसरल्याचे दर्शवितात.

एप्रिल

वर्ष - बडा कब्रस्तान - आयेशानगर कब्रस्तान

२०१९ - १४० - ४५

२०२० - ४५९ - १३३

२०२१ - २४८ - ८४

मे

वर्ष - बडा कब्रस्तान- आयेशानगर कब्रस्तान

२०१९ - २०७ - ५०

२०२० - ३४१ - १७८

२०२१ - २३६ - ७४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT