Malegaon Lungi very populer during Ramzan Nashik News esakal
नाशिक

मालेगावची लुंगी 'लई भारी' | Nashik

जलील शेख

मालेगाव (जि. नाशिक) : यंत्रमागाचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या मालेगावातील लुंगीला देशभरातून मागणी असते. कापडाबरोबरच शहरात पाच दशकापासून लुंगी तयार केली जाते. इंधन दरवाढीमुळे सुताचे भाव वाढल्याने येथील लुंगी व्यवसाय अडचणीत सापडला आहे. रमजान महिन्यात (Ramzan Festival) लुंगीला चांगली मागणी आहे. आठवड्याला येथे ३५ हजार लुंगी तयार होतात. रमजानमध्ये विक्रीत वाढ होत असून चॉंदरातपर्यंत व्यवसायाला झळाळी येईल अशी अपेक्षा आहे. येथील लुंगीचा बाज वेगळाच असल्याने ग्राहकांची पसंती मिळत आहे.

मालेगावात १९७० पासून लुंगी तयार केली जाते. शहरात लुंगी तयार करण्याचे २० कारखाने आहेत. येथील लुंगी तेजीत देशात भाव खाते. महागाईमुळे सुताचे भाव दुप्पट वाढल्याने मालेगावच्या लुंगीला घरघर लागली आहे. सुताचे भाव, वीज व वाहतूक खर्चात वाढ झाल्याने लुंगीचेही भाव वाढले आहेत. कारखानदारांना लुंगी बनविण्यास परवडत नाही. रमजान सणानिमित्त बाजारपेठांमध्ये मालाची साठवणूक करुन ठेवण्यात आली आहे. येथील लुंगी पाठोपाठ तामिळनाडू, चेन्नई, ऐरोळ, उत्तरप्रदेश, कोलकात्ता, भिवंडी आदी ठिकाणच्या लुंग्याही बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

मालेगावची लुंगी इतर लुंगीपेक्षा स्वस्त व टिकाऊ असल्यामुळे बाजारात मागणी कायम आहे. येथे महिन्याला एक लाख ४० हजार लुंगी तयार होतात. शहरासह परिसरातून ग्राहक खरेदीसाठी येतात. लुंगीच्या किंमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. येथील लुंगीचा माल मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, ओडिसा, उत्तरप्रदेश, हैद्राबाद, तेलंगना, मुंबई आदी ठिकाणी विक्रीसाठी जातो. येथील एका यंत्रमागावर दिवसभरातून चार ते पाच लुंग्या तयार होतात. प्रामुख्याने कॉटन व टेरिकॉट लुंगी तयार केली जाते. त्यात कॉटनला अधिक पसंती असते. शहरात आठ ते दहा लुंगी विक्रीचे दुकाने मोहम्मद अली रोड येथे आहेत. लुंगीला मुस्लीम बांधवांबरोबरच हिंदू बांधवांकडूनही प्रतिसाद मिळतो.

मालेगाव लुंगीचे दर

चारमिनार लुंगी- १५० ते १७०

सिल्व्हर किंग - १५० ते १८०

मौलाना (मद्रास लुंगी) -३५० ते ९००

इस्माईल लॉक ब्रॅंड - ३०० ते ६००

गाईड लुंगी - १५० ते २५०

जीवनदान - १२० ते १३०

"सुताचे भाव दुप्पटीने वाढले आहेत. शासनाने याकडे लक्ष द्यावे. अशीच भाववाढ होत राहिल्यास मालेगाव शहरातील अनेक कारखाने बंद पडतील. अनेक नागरिरकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न उद्‌भावणार आहे."

- मलिक अन्सारी, कारखानदार, मालेगाव

"सलग दोन वर्षे कोरोनामुळे मोठ्या बाजारपेठ बंद होत्या. कोरोना काळात मालेगाव शहर हे उत्तर महाराष्ट्राचे खरेदीचे हब बनले होते. नागरीक खरेदीसाठी मालेगाव गाठत होते. त्यावेळी लुंगीला मोठ्या प्रमाणात मागणी होती. महागाई व युवकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने लुंगी व्यवसाय अडचणीत आला आहे. युवक बर्म्युडा पॅन्ट घालत असल्याने मागणी कमी होत आहे."

- नारायण गवळी, संचालक, ताज लुंगी सेंटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT