Cultural Hall File Photo esakla
नाशिक

Nashik News: सांस्कृतिक सभागृहाची मालेगावकरांना प्रतिक्षाच! अद्ययावत सभागृह नसल्याने कला,साहित्य चळवळीला खीळ

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर : मालेगावच्या मातीला सांस्कृतिक वारसा आहे. विविधतेतून एकता सांगणाऱ्या अशांत शहराची बेनामी ओळख पुसण्याचे काम साहित्य, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींनी केल्याचा इतिहास आहे.

मात्र बारा लाखांवर लोकसंख्येच्या शहरात एकही चांगले अद्ययावत सार्वजनिक नाट्यगृह नसल्याने सांस्कृतिक क्षेत्र आणि कलावंत यांची परवड होत आहे.

एकंदरीत सध्याच्या घडीला येथील सांस्कृतिक क्षेत्राला खीळ बसली आहे. (Malegaon people waiting for cultural hall Arts and literature movement hampered due to lack of up to date hall Nashik News)

हॉलीवूड व बॉलिवूडच्या धर्तीवर अल्प खर्चाच्या 'मॉलीवूड' ही मालेगावची चित्रपटसृष्टी सर्वदूर प्रसिद्ध आहे. अनेक छोट्या-मोठ्या कलाकारांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो.

मात्र सांस्कृतिकदृष्ट्या महापालिकेचे अद्ययावत कुठलेही सभागृह उपलब्ध नसल्याने येथील सांस्कृतिक विकासाला खीळ बसली असल्याची खंत कलारसिक व्यक्त करतात.

शहरात कलावंत यांना आपली कलेचे सादरीकरण करण्यासाठी बालगंधर्व नाट्यगृह, शिवाजी टाऊन हॉल आहे. या दोन नाट्यगृह वगळता कलाकारांना अशी सुविधा नसल्याने त्यांना अपेक्षित वाव मिळत नाही.

वाढत्या महागाईत हा खर्च नवोदित कलाकारांना सोसवत नाही. अनेक शहरात कला, नाट्यपरंपरा जोपासण्यासाठी नाट्यमंदिर, कलामंदिर खासगीकरणातून उपलब्ध आहेत. प्रशस्त नाट्यगृहासाठी उदासीनता या ठिकाणी दिसून येते.

त्यामुळे नाट्य व मॉलीवूड क्षेत्रातील नव्या पिढीला ओळख देण्यासाठी महापालिकेने नाट्यगृह उभारावे अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे.

शहरातील पूर्व पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात कला रसिक आहेत. अनेक सांस्कृतिक व साहित्य संस्था या ठिकाणी आहेत. नाट्यगृह नसल्याने खासगी हॉल, शासकीय इमारती, शाळा महाविद्यालय यांच्या हॉल या माध्यमातून छोट्या मोठ्या कार्यक्रमांची गरज भागवली जाते.

सांस्कृतीक चळवळीच्या कार्यकर्त्यांना अशा उपक्रमांसाठी कार्यालय घेताना पदरमोड सोसावी लागते. नाट्याचा जुना वारसा असताना नव्या पिढीला याचा कुठलाही फायदा नसल्याने कलावंत महापालिकेच्या कार्यपद्धतीवर सातत्याने नाराजी व्यक्त करतात.

तीन वर्षापासून विषय प्रलंबित

नाट्यगृहाबाबत तत्कालीन आयुक्त संगीता धायगुडे यांनीही महापालिकेच्या नाट्यगृहासाठी निश्चित केलेल्या जागेची हस्तांतर कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासन कलावंतांना दिले होते.

'ती आणि फलाट क्रमांक' या नाटकाच्या प्रयोगावेळी तीन वर्षापूर्वी उपायुक्त नितीन कापडणीस यांनी हाच धागा पकडून सांस्कृतिक सभागृहासाठी मालेगावच्या कलावंत यांना आश्वासन दिले.

मात्र अधिकारी बदलून गेल्याने हा विषय मागे पडला. आता सोमवार बाजार परिसरात सांस्कृतिक सभागृहासाठी पालकमंत्री दादा भुसे प्रयत्नशील असल्याने आशेचा किरण दिसत आहे.

"सांस्कृतिक इतिहास असलेल्या शहरात नाट्यगृह नसल्याने अनेक कलावंतांना समाजातील दानशूर घटकांची मदत घ्यावी लागते. अद्ययावत असे सभागृह नसल्याने येथील नवी पिढी साहित्य कला, नाट्य, सांस्कृतिक क्षेत्रापासून हळूहळू दूर जात आहे. त्यामुळे यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा."-डॉ. विनोद गोरवाडकर, अध्यक्ष मराठी साहित्य परिषद

"अनेक उदयोन्मुख कलावंत विविध वाहिनीवर झळकत आहे. शहरात सांस्कृतिक सभागृह नसल्याने सराव, मार्गदर्शक कार्यक्रम होत नाही. चळवळीतील अनेक छोट्या मोठ्या संस्थांना जुळवाजुळव व आर्थिक तजवीज करून कार्यक्रम घ्यावा लागतो. महापालिकेने नाट्यगृह उभारून शहराचा सांस्कृतिक विकासात भर घालावी."- कविता डोखे, कलारसिक

"कला साहित्य व सांस्कृतिक चळवळीला खरी गरज सभागृहाची असते. स़़ध्याच्या महागाईच्या युगात सभागृहासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. हौसेला मोल नसते अशाच प्रकारे काही प्रमाणात एकत्र येऊन जिथे स्वस्त जागा उपलब्ध असेल तिथे कलेचे कार्यक्रम घेतात. शहराच्या सांस्कृतिक वैभवासाठी नाट्यगृह आवश्यक आहे."

- सुनील वडगे. सिंगर ग्रुप मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT