Crime News  esakal
नाशिक

Nashik Crime News : अन्नदानाच्या बहाण्याने मंडप डेकोरेटरला गंडविले! भांडी घेऊन संशयित पसार

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : रामतीर्थ परिसरात अन्नदान करावयाचे असल्याचे भासवून मंडप डेकोरेटरला सुमारे पावणेदोन लाखास गंडवल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. ३०) समोर आला. यामध्ये संशयिताने अन्न तयार करण्यासाठी लागणारे सुमारे १ लाख ७८ हजार रुपये किमतीचे भांडे लंपास केले.

याबाबत रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Mandap decorator cheated on pretext of food donation suspect fled with utensils Nashik Crime News)

पंजाब खुरला येथील संशयित विकासकुमार खन्ना याने रामतीर्थ परिसरात गुरुवारी (ता. २९) अन्नदान करावयाचे असून, त्यासाठीच्या भांड्यांसंदर्भात बुधवारी (ता. २८) पखाल रोड, द्वारका येथील तक्रारदार मंडप डेकोरेटर मोबीन आत्तार यांची भेट घेतली. त्यांना अन्नदान कार्यक्रमाची कल्पना दिली.

त्यासाठी भांडे लागणार असल्याचे सांगितले. स्वतःची संपूर्ण ओळख सांगून त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर भाडोत्री भांड्यांचे ठरलेल्या भाड्यातील ३ हजार ८०० रुपयांची अर्धी रक्कम श्री.आत्तार यांना दिली. यामध्ये १८ पातीले, १२ लोखंडी झाकण, ४ गॅस शेगड्या, ८ ट्रे असे सुमारे १ लाख ७८ हजारांचे भांडे गंजमाळ येथील रॉयल हेरिटेज हॉटेलमध्ये बुधवारी सायंकाळपर्यंत पोचविण्यास सांगितले.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

श्री. आत्तार यांनी त्यांच्या रिक्षातून सर्व भांडे त्याठिकाणी पोचविले. संशयिताने हॉटेल आवारात भांडे उतरवून घेतले. गुरुवारी सकाळी तक्रारदार भांडे घेण्यासाठी हॉटेलमध्ये पोचले. त्यांनी संशयीताच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, त्याने आपण बाहेर असल्याचे सांगून मोबाईल कट केला. त्यामुळे तक्रारदारांना संशय आल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकांशी संपर्क करून विकासकुमार खन्नाबाबत माहिती घेतली.

त्यावर, खन्ना हा रात्रीच रिक्षात भांडे घेऊन निघून गेल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली. त्यानंतर रामतीर्थ परिसर गाठत संशयिताचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे त्याने भांडे लंपास करून फसवणूक केल्याची खात्री झाली. त्यांनी शुक्रवारी (ता. ३०) भद्रकाली पोलिसांशी संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT