ward reservation draw esakal
नाशिक

आरक्षणाने बिघडले गणित; काही प्रस्थापितांचे गड शाबूत, तर काहींना धक्का

अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : मनमाड नगर पालिकेच्या (Manmad Municipality) प्रभाग रचनेचा आराखडा जाहिर झाल्यानंतर आज १६ प्रभागाची आरक्षण सोडत (ward reservation draw) जाहिर करण्यात आली. या वेळी अध्यासन अधिकारी तथा मालेगावचे प्रांत विजयानंद शर्मा, मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आले. यात अनुसूचित जातीसाठी (SC) ९ तर अनुसूचित जमातीसाठी (ST) २ जागा राखीव ठेवण्यात आले असून, ३३ जागांपैकी १७ जागा महिलांसाठी राखीव झाले आहेत. (Manmad Municipality announced ward reservation draw Nashik News)

येथील नेहरू भवनमध्ये आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला. आजच्या प्रभाग आरक्षणामुळे पालिकेतील मावळत्या काही नगरसेवकांचे आपले आरक्षण गेले आहे. तर काही इच्छुकांना याचा फटकाही बसला आहे. त्यामुळे आजच्या आरक्षण सोडतीवर राजकीय क्षेत्रांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अध्यासन अधिकार विजयानंद शर्मा यांनी आरक्षण सोडतीबाबत प्रशासकीय आदेश स्पष्ट करून विवेचन दिले. मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल, अशोक पाईक, अजहर शेख, बाबा दराडे, किरण आहेर, कैलास पाटील, अमोल बागूल, मयूर चौधरी, अनिल गवळी, पांडूरंग सूर्यवंशी आदींनी या सोडत बैठकीचे नियोजन केले.
शहरात १६ प्रभाग तयार करण्यात आले आहे. त्यात १५ प्रभागांतून दोन असे ३०, तर प्रभाव क्रमांक १६ मधून ३ म्हणजे ३३ नगरसेवक नगरपालिकेत निवडून द्यावयाचे आहेत. कार्तिक खैरनार, दिव्या हिरणवाळे या मुलांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.

आरक्षण रचना पुढीलप्रमाणे ....
प्रभाग- १ (अ) : सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण (हनुमान नगर, तिवारी वाडी, भाबडवस्ती, डोणगांव रोड, शिक्षक कॉलनी, सगळे गॅस पंपामागील भाग आणि विवेकानंद नगरचा काही भाग), प्रभाग- २ (अ) : सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण (डॉ. आंबेडकर नगर, सिकंदर नगर, किर्ती नगर, कोतवाल नगर, बुरकुलवाडीचा भाग), प्रभाग- ३ (अ) : अनु.जाती महिला (ब) सर्वसाधारण. (पॉवर हाऊस, औद्योगिक वसाहत, एफ सीआय क्वॉटर्र, गर्डर शॉप, सटाणा रोड, चंदनवाडी), प्रभाग- ४ (अ) : अनुसूचित जाती (ब) सर्वसाधारण महिला (विवेकानंद नगर नं. १, डॉ. आंबेडकर चौक, डॉ. आंबेडकर बोर्डींग, माऊली नगर, सिध्दार्थ हौ. सोसायटी, प्रभाग- ५ (अ) : अनु. जाती महिला, (ब) सर्वसाधारण (बुधलवाडी, माधव नगर, विवेकानंद नगर, पांडूरंग नगर, मुरलीधर नगर, सनजित हौसिंग सोसायटी, राजवाडा), प्रभाग- ६ : (अ) सर्वसाधारण महिला (ब) सर्वसाधारण (आययुडीपी, प्रोफेसर कॉलनी, मनोरम सदन भिंत, ललवाणी रो- हाऊस प्लॉट आणि गुजर कोचिंग क्लासेस),

प्रभाग ७- (अ) अनु. जमाती महिला (ब) सर्वसाधारण (टकार मोहल्ला, मनोरम सदन, झोपडपट्टी, हुसैनी चौक, जामा मशिद परिसर, कोर्ट रोड, नुर चौक परिसर, राजवाडा, रोहिदास वाडा, कुंभारवाडा, शनि मंदिर, बालाजी मंदिर आणि भिलाटी परिसर, प्रभाग- ८ (अ) : अनु. जाती महिला (ब) सर्वसाधारण (डिसोजा मैदान, बोहरी कंपाऊंड, पोलिस क्वॉर्टर, रेल्वे वर्कशॉप परिसर, नजराणा सोसायटी, हबीब नगर, आनंदवाडी भाग, कारंडे वस्ती, क्रांती नगर परिसर), प्रभाग- ९ (अ) : महिला सर्वसाधारण, (ब) सर्वसाधारण (मुक्तांगण परिसर, गांधी चौक परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, माणके कंपाऊंड परिसर आणि सराफ बाजार), प्रभाग- १० (अ) : अनु. जाती, (ब) सर्वसाधारण महिला (जमधाडे चौक, ५२ नंबर, महात्मा फुले चौक परिसर, ललवाणी बिल्डींग परिसर, सावित्रीबाई फुले मार्केट परिसर), प्रभाग ११- (अ) : सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण (गवळी झोपडपट्टी, नेहरू भवन, गुरूद्वारा परिसर, आनंद विहार परिसर, स्विपर कॉलनी आणि इदगाह परिसर),

प्रभाग- १२ (अ) : अनु.जाती, (ब) सर्वसाधारण महिला (संभाजी नगर, वसंत हौसिंग सोसायटी, हुडको परिसर, केशव हौसिंग सोसायटी, शिवाजी नगर नं.१, सिध्दीविनायक नगर, डी.के.पगारे नगर), प्रभाग- १३ (अ) : अनु. जमाती, (ब) सर्वसाधारण महिला (हुडको भाग, हुडको भाग, कुलथे कॉलनी, केकाण नगर, दरगुडे वस्ती, अश्‍विनी नगर, शिवाजी नगर नं. २, महात्मा फुले हौसिंग सोसायटी), प्रभाग- १४ (अ) अनु.जाती, (ब) सर्वसाधारण महिला (रमाबाई नगर, भारत नगर, रेल्वे कॉलनी, पंचवटी परिसर विभाग, वडार वस्ती, रेल्वे स्टेशन लगतचा भाग लागून, दक्षिण भाग), प्रभाग- १५ (अ) अनु. जाती महिला, (ब) सर्वसाधारण (शाकुंतल नगर, बेंद्रे चाळ, सर्व्हे नं. १५३, सर्व्हे नं.१४१, २८ युनिट, कातकडे वस्ती, ट्रेनिंग कॉलेज परिसर, शाळा नं. १४ आणि कॅम्प विभाग), प्रभाग- १६ (अ) अनु. जाती महिला, (ब) सर्वसाधारण महिला, (क) सर्वसाधारण (शांती नगर, महानंदा नगर, श्रावस्ती नगर, गोपाल नगर, वेलंकणी नगर, आदर्श नगर, जनार्दन नगर, कॅम्प पश्‍चिम विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT