The rush of passengers caused by the departure of the train from Dhule. esakal
नाशिक

Nashik News : गोदावरी एक्स्प्रेस बंदने मनमाडकर संतप्त; आंदोलनाच्या पवित्र्यात, विशेष गाडीऐवजी हवी ‘गोदावरी’

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : चाकरमान्यांची जीवनदायिनी असलेली गोदावरी एक्स्प्रेस बंद करून तिच्या जागी सुरू केलेली उन्हाळी विशेष रेल्वेही आता धुळ्यापासून सुरू केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आठवड्यातून तीन दिवस ही गाडी धुळ्यापासून सुटणार असल्याची घोषणा रेल्वेने केल्याने मनमाडकर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

आता विशेष गाडी न सोडता आमची जुनी गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. (Manmadkar angry over Godavari Express closure posture of agitation want Godavari instead of special train Nashik News)

मनमाड रेल्वे स्थानकात गोदावरी एक्सप्रेसच्या वेळेत मंगळवारी धुळ्याहून मनमाडला ही गाडी स्थानकात आली असता या गाडीमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसली होती तर दुसरीकडे पाय ठेवायला देखील जागा नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप होता.

त्यातच ही गाडी गोदावरी एक्स्प्रेस नसल्याचे प्रवासी व चाकरमान्यांच्या लक्षात येताच नाशिककडे रवाना झालेल्या गाडीची सुमारे १५ ते २० वेळेस चेन ओढण्यात आली. त्यामुळे जवळपास अर्धा तास या गाडीला उशीर झाला होता.

याबाबत येथील रेल्वे प्रशासनाच्या कार्यालयात काही प्रवाशांनी जाब विचारला असता प्रशासनाकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले. मनमाड शहरातून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस कोविड काळापासून बंद करून त्याजागी उन्हाळी विशेष रेल्वे सुरू केली होती.

मात्र आता ही रेल्वे एक मे पासून धुळे दादर ही नवीन रेल्वे आठवड्यातून तीन दिवस सुरू केल्याची घोषणा केली. मनमाड- दादर सुपरफास्ट एक्स्प्रेस मनमाड वरून धुळ्याला पळवून नेल्याची माहिती समोर आल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

रेल्वे प्रशासनाने नवीन सुरू करण्यात आलेली धुळे -दादर एक्स्प्रेस ही आठवड्यातून तीन दिवस असून गुरुवारची सुट्टी घेऊन तीन दिवस मनमाडहून ही गाडी धावणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रवाशांची मागणी...

नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, येथून हजारो चाकरमाने रोज मुंबईपर्यंत प्रवास करतात. गोदावरी एक्स्प्रेस ही त्यांची हक्काची गाडी असल्याने रेल्वे प्रशासनाने पुन्हा गोदावरी एक्स्प्रेस सुरू करून प्रवासी, व्यावसायिक, उद्योजक, चाकरमाने आणि व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा.

रेल्वे प्रशासनाचे म्हणणे ....

गाडी क्र.०१०६६ / ६५ धुळे - दादर - धुळे ही गाडी सप्ताह मधून तीन दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार, शनिवार ही गाडी धावेल. तर उरलेले तीन दिवस बुधवार, शुक्रवार आणि रविवार गाडी (क्र.०२१०१/०२) मनमाड - दादर - मनमाड अशी धावेल. सध्या धुळे- दादर -धुळे एक्स्प्रेस ही गाडी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT