Deepak Kesarkar News : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे शिर्डीत प्रार्थनेनंतर कोल्हापुरात पाण्याची पातळी वाढली नाही.
हे विधान वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत आहे. त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. (MANS statement on deepak kesarkar comment about shirdi nashik news)
महाराष्ट्र अंनिसने निवेदन दिले असून, त्यात नाशिक येथील पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले, की कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीच्या वेळी ते शिर्डीत होते. तेथे त्यांनी प्रार्थना केली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले तरीही, पुराच्या पाण्याची पातळी वाढली नाही.
ऐरवी धरणाचे दरवाजे उघडले तर पाण्याची पातळी दोन फूट किंवा त्यापेक्षा जास्त वाढते. मात्र केवळ ते शिर्डीत असल्याने धरणाचे दरवाजे उघडले तरीही पाण्याची पातळी वाढली नाही आणि त्यामुळे गावे पाण्याखाली गेली नाहीत. पुढे ते असंही म्हणाले, की याला अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा पण जे घडले ते सर्वांनी पाहिले, असा अजब आणि चमत्कार सदृश दावा केसरकर यांनी केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
खरंतर शालेय शिक्षणमंत्री या अतिशय जबाबदारीच्या संवैधानिक पदावर आरूढ असलेल्या व्यक्तीने असा अवैज्ञानिक, भंपक दावा करणे हे पूर्णतः चुकीचे आहे. शिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मूलभूत गाभा घटकात अंतर्भाव असलेल्या, तसेच मूल्य शिक्षणातही ज्याचा जाणीवपूर्वक समाविष्ट करण्यात आलेला आहे.
भारतीय राज्यघटनेमध्ये ५१ क मध्ये शोधक बुद्धी, मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अंगीकार, प्रचार आणि प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य सांगितले आहे. अशा वैज्ञानिक दृष्टिकोन व मूल्याशी शिक्षणमंत्र्यांचे विधान पूर्णपणे विसंगत व आक्षेपार्ह आहे.
त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी अवैज्ञानिक विधान मागे घेत असल्याचे जाहीर करून दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.