नाशिक : गेल्या आठवडाभरात शहर गुन्हेशाखेसह पोलीस ठाण्यांच्या गुन्हेशोध पथकांनी अट्टल चार दुचाक्या चोरट्यांना जेरबंद केले. या चोरट्यांकडून लाखोंच्या चोरीच्या दुचाक्या हस्तगतही केल्या.
असे असले तरीही शहरातील दुचाक्या चोरीचा सिलसिला थांबलेला नाही. त्यामुळे शहरात दुचाक्या चोरटे आहेत तरी किती, असे म्हणण्याची वेळ पोलीस अधिकार्यांवर आली आहे. दरम्यान, शहर हद्दीतून पुन्हा पाच दुचाक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. (many bike thieves in city after imprisoning thieves incidents continues Nashik Crime)
रमेश प्रभाकर भगत (रा. साईबंधन, इंदिरानगर) यांची १५ हजारांची होंडा पॅशन प्रो दुचाकी (एमएच १५ इडी ४१२२) गेल्या रविवारी (ता. १४) गंगाघाटावरील यशवंत महाराज मंदिराला बाजुला असलेल्या पटांगण येथे पार्क केली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश तुकाराम पाटील (रा. पिंपळचौक, भद्रकाली) यांची १५ हजारांची पॅशन पल्सर दुचाकी (एमएच १५ सीबी ४९४०) गेल्या १८ डिेसेंबर रोजी पिंपळचौकातून चोरीला गेली होती.
भद्रकाली पोलिसांनी संशयित गणेश रमेश पाटील (२१, रा. औरंगाबाद रोड) यास अटक केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमान समद खान (रा. मेहबुब नगर, वडालागाव) यांची ४० हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ जीएच २८५०) व खान यांचे सहकारींची ॲक्टिवा मोपेड गेल्या ७ तारखेला गडकरी सिग्नलजवळील एलआयसी ऑफिसच्या गेटजवळून अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालचंद्र यादवराव ठाकरे (रा. जयपार्क रो हाऊस, कालिकानगर, उंटवाडी) यांची १५ हजारांची दुचाकी (एमएच १५ डीई ६३२५) गेल्या ११ तारखेला मध्यरात्री राहत्या घराच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने लंपास केली.
याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगवेंदरसिंग मेहंदरसिंग भट्टी (रा. हरिनक्षत्र अपार्टमेंट, पुणे हायवे, नाशिकरोड) यांची २० हजारांची मॅस्ट्रो दुचाकी (एमएच १५ ईआर ४७९६) गेल्या रविवारी (ता १४) मालदक्का रोडवरील सरदार चाळीतील किराणा दुकानासमोरून चोरीला गेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीच्या २२ दुचाक्या जप्त
गेल्या आठवडाभरात शहर गुन्हेशाखचे युनिट दोनच्या पथकाने चोरीच्या १७ दुचाक्यासह दोघांना जेरबंद केले. तर, भद्रकालीच्या गुन्हेशोध पथकाने दोघांकडून चोरीच्या चार दुचाक्या, व एका चैनस्नॅचरकडून एक अशा १४ लाख ९० हजारांच्या २२ चोरीच्या दुचाक्या हस्तगत केल्या आहेत.
तर दुसरीकडे शहरातील दुचाक्या चोरीचे गुन्हे थांबण्याऐवजी सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे शहर पोलिसांना दुचाकी चोरटे डोकेदुखी ठरत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.