cars ban esakal
नाशिक

Nashik News: मोठ्या कंपन्यांच्या अनेक कार होणार बंद! ऑटोमोबाईल क्षेत्रातील शेकडो लघुउद्योगांनाही फटका

सतीश निकुंभ

सातपूर (जि. नाशिक) : ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या एक, दोन नव्हे, तर तब्बल १७ कार कायमस्वरूपी बंद होणार आहेत. अर्थात, या कारचे उत्पादन यापुढे होणार नाही. त्यामुळे ग्राहकांसाठी यापैकी एखादी कार फेव्हरिट असेल, तर त्यांच्या पदरी निराशा पडणार आहे.

दुसरीकडे यात नाशिकची ऑटोमोबाईल इंडस्ट्री असलेल्या महिंद्र अॅन्ड महिंद्र कंपनीच्या गाड्यांचाही समावेश आहे. या निर्णयामुळे नाशिकमधील शेकडो सुटे भाग बनवणाऱ्या लघुउद्योगांनाही फटका बसला आहे. यातील अनेकांनी बदल लक्षात घेऊन आपल्या उत्पादनाचा पर्याय शोधला आहे.

काहींना मात्र याचा जबर फटका बसला आहे. यामुळे शेकडो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड चालवली जाणार आहे. (Many cars of big companies will closed Hundreds of small industries in automobile sector also affected Nashik News)

ज्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या ठराविक कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या कंपन्यांच्या गाड्याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धावताना दिसतात, हे विशेष. यातील बहुतांश डिझेल कार असल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा होणार आहे. या कंपन्यांमध्ये होंडा, महिंद्र, ह्युंदाई, स्कोडा, रेनॉ, निसान, मारुती सुझुकी, टोयोटा आणि टाटा महिंद्र यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने कठोर नियमांची अंमलबजावणी केल्यामुळे वाहनांच्या आरडीईनुसार बीएस-६ फेज-२ चे नियम १ एप्रिलपासून लागू झाले आहेत. अशा परिस्थितीत या वाहनांना आरडीई मानदंडाची पूर्तता करणे कठीण होईल आणि कार कंपन्यांना वाहनांची विक्री थांबवावी लागेल.

यामुळे ह्युंदाईला आपल्या आय-२० कारचे डिझेल मॉडेल आधीच बंद करावे लागले आहे. यापूर्वी टोयोटा आणि फोक्सवॅगननेही त्यांच्या डिझेल कारची निर्मिती बंद करणार असल्याचे म्हटले आहे.

इंजिन अपडेट करावे लागेल

नवीन उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी वाहनांमधील विद्यमान मॉडेलचे इंजिन अपडेट करावे लागेल. त्यामुळे वाहनांच्या किमतीही वाढत आहेत. बीएस ६ इंजिनमुळे तीन वर्षांपूर्वी कारच्या किमती ५० ते ९० हजाराने, तर दुचाकीच्या किमती तीन ते दहा हजारांनी वाढल्या होत्या. तसाच प्रकार आताही होईल आणि त्याचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागेल.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

या कार दिसणार नाहीत

१ एप्रिलपासून होंडाच्या पाच, महिंद्रच्या तीन, ह्युंदाई आणि स्कोडाच्या प्रत्येकी दोन, तर रेनॉ, टोयोटा, टाटा, निसान, मारुती सुझुकी यांच्या प्रत्येकी एक कार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सुरवात ह्युंदाई कंपनीने केली असल्याचे सांगितले जाते.

डिझेल इंजिनच्या पर्यायावर संशोधन

टाटापाठोपाठ महिंद्रने काही वर्षांपासून डिझेल इंजिनच्या पर्यायावर संशोधन सुरू केले आहे. इगतपुरी येथील महिंद्रच्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर इनोव्हेशन करून नवीन प्रणालीच तसेच ई-व्हेकल इंजिन तयार होत आहेत.

यापुढे आता त्याला अधिक गती दिली जाणार आहे. डिझेल गाड्या बंद होणार असल्याने नाशिकमधील अनेक लघुउद्योगांना याचा फटका बसला आहे. नाशिकमधील शेकडो लघुउद्योगांकडून देशातील आघाडीच्या कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना इंजिनचे पार्ट पुरवले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT