esakal
नाशिक

Nashik | बागलाण तालुक्यात पशुधन वाऱ्यावर; सोशल मिडियावर खिल्ली

तालुक्यातील पशुधन वाऱ्यावर सोडल्याची भावना पशुपालकांकडून व्यक्त होत आहे.

दिपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा

अंबासन (जि. नाशिक) : तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक पदे रिक्त असल्यामुळे दवाखाने ओस पडत असल्याने सोशल मिडियावरून (Social media) याबाबत चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. पशुसंवर्धन विभागांतर्गत सर्वच कामकाजावर अतिरिक्त कार्यभार येत असून, तालुक्यातील पशुधन वाऱ्यावर सोडल्याची भावना पशुपालकांकडून व्यक्त होत आहे. (Latest marathi news)

जनावरांना कुठल्याही रोगाची लागण होऊ नये, वेळेत उपचार मिळावेत यासाठी शासनाने ठिकठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने उभारले आहेत. तालुक्यात श्रेणी- १ चे १०, तर श्रेणी- २ चे १३ दवाखाने असून, चिराई येथे स्वतंत्र केंद्रांतर्गत जनावरांचा दवाखाना आहे. तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे पशुपालकांच्या पशुधनास लसीकरण करणे, कृत्रिम रेतन, उपचार करणे, खच्चीकरण आदी सेवा प्रदान करताना प्रचंड अडचणी येत आहेत. उपलब्ध डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर ३ ते ४ ठिकाणाचा अतिरिक्त कार्यभार पडत असल्याने प्रचंड अडचणींना सामोरे जाऊन ताण सहन करावा लागत आहे.

अपुऱ्या तांत्रिक मनुष्यबळाचा प्रत्यक्ष परिणाम पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांवर होत आहे. यामुळेच सोशल मिडियावरून पशुवैद्यकीय दवाखान्याबाबत वेगवेगळे विनोदी लेखन करत खिल्ली उडवली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, विविध शासकीय योजना ग्रामीण भागातील तळागाळातील शेतकऱ्यांना पोहचवण्यात प्रचंड अडचणी व समस्या उद्‌भवत आहेत. यामुळे हकनाक पशुसंवर्धन विभागास तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

शेतकऱ्यांची पाळीव जनावरे आजारी पडल्यास खासगी डॉक्टरांना बोलवावे लागते. ते मनमानी पद्धतीने शुल्क घेतात, असा आरोपही पशुपालक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. शासनाने लक्ष केंद्रित करून तातडीने रिक्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या जागा भरून जनावरांची होत असलेली हेळसांड थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव मंजूर भरलेले रिक्त
पशुविकास अधिकारी ११ १ १०
सहाय्यक पशुविकास अधिकारी २ १ १
पशुधन पर्यवेक्षक १४ १२ २
व्रणोपचारक ८ ६ २
परिचर ३१ ९ २२

''रिक्त पदांमुळे पशुधनावर उपचार व लसीकरणासाठी डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नाहीत. तसेच, या विभागाच्या विविध योजनादेखील शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत.'' - जिभाऊ कापडणीस, प्रगतिशील शेतकरी, टेंभे खालचे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ausa Assembly Election 2024 Result : देवेंद्र फडणवीस अभिमन्यू पवारांना मंत्री करणार; औसेकरांना विश्वास

Jalgaon Assembly Election 2024 Result : ब्रेक के बाद...गुलाबरावांची ‘हॅट्ट्रिक’; ‘जळगाव ग्रामीण’मधून 59 हजारांचे मताधिक्य

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

IPL 2025 Auction Live: मोहम्मद सिराजसाठी बंगळुरूने RTM चा पर्याय नाकारला अन् सिराज गुजरातमध्ये दाखल झाला

Latest Maharashtra News Updates : रांचीतील राजभवनाबाहेर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दाखवली एकजूट, सरकार स्थापनेचा दावा

SCROLL FOR NEXT