Protesters bombarding MP Hemant Godse, who came to visit the agitation on the Maratha reservation issue. esakal
नाशिक

Maratha Reservation : आप्पा, 40 दिवस कोठे होते? सकल मराठा समाजाचा खासदार हेमंत गोडसेंना सवाल

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सीबीएस येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याशेजारी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांच्या भेटीला गेलेल्या खासदार हेमंत गोडसेंना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

‘आप्पा, तुम्हाला येथे येण्यासाठी ४० दिवस का लागले, मराठा समाजाची जाहीरपणे भूमिका घ्यायला तुम्हाला लाज वाटते का, अशा प्रश्नांचा भडिमार उपोषणकर्त्यांनी केला. उपोषणकर्त्यांच्या तीव्र भावना बघता खासदार गोडसेंनी लागलीच काढता पाय घेतला. थोड्या वेळातच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे खासदारकीचा राजीनामा लिहीत तो पाठविल्याचे सांगितले. (Maratha community Question MP Hemant Godse about reservation nashik news)

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नाशिकमधील सकल मराठा समाजातर्फे बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाचा सोमवारी (ता. ३०) ४८ वा दिवस आहे. राज्यभरात आंदोलन अधिक तीव्र होत असताना नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या वेळी समाजाच्या तीव्र भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केल्या.

‘समाजाची भूमिका तुम्ही जाहीरपणे का मांडत नाहीत, तुम्ही उपोषणकर्त्यांची भेट घेण्यापेक्षा लोकसभेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडून समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळवून द्या, अशी कळकळीची विनंती येथील उपोषणकर्त्यांनी केली. ओबीसी किंवा इतर समाजाचे आमदार आपली भूमिका मांडताना प्रथम समाजाचे नाव घेतात.

मराठा समाजाचा एकही आमदार किंवा खासदार जाहीरपणे बोलत नाही, की मी मराठा समाजाचा आहे. त्यांना समाजाची लाज वाटते का? इतके दिवस झाले, समाजाचे लोक उपोषण करत आहेत. तरी नेतेमंडळी राजकीय कार्यक्रम घेतात; मग समाजाला काहीच किंमत नाही का? असा प्रश्न नाना बच्छाव यांनी उपस्थित केला.

समाजाच्या भावना ऐकून घेताना खासदार गोडसे यांनी ‘सारथी’च्या माध्यमातून समाजाचे काम केल्याचे सांगितले. पण त्या सारथीचा काय उपयोग आहे ते तरी सांगा, असा प्रतिप्रश्न करत उपस्थित महिलांनीही तोंडसुख घेतले.

खासदार गोडसेंचा राजीनामा ‘स्टंट’

सकल मराठा समाजाच्या तीव्र रोषाला सामोरे गेल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी सोमवारी (ता. ३०) सायंकाळी खासदारकीचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे लिहिला आहे. त्यात सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी समाजाची भावना निर्माण झाली आहे.

त्यासाठी ठिकठिकाणी उपोषण सुरू झाले आहे. समाजाला आरक्षण मिळावे, ही भावना विचारात घेऊन मी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे खासदार गोडसेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मूळात खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या नावे राजीनामा लिहिणे अपेक्षित आहे. पण खासदार गोडसेंनी मुख्यमंत्र्यांच्या नावे आपला राजीनामा देऊन ‘स्टंट’ केल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT