Members of the community participated in the fast in the morning for the demand of Maratha reservation esakal
नाशिक

Maratha Reservation Andolan: मराठा समाजाच्या शेकडो युवकांच्या सहभागाने ममदापुरात साखळी उपोषण सुरू

सकाळ वृत्तसेवा

येवला : समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी ममदापूर येथे शुक्रवार (ता. ३) पासून शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत साखळी उपोषणाला सुरवात झाली.

पहिल्या दिवशी परिसरातील बारा ते पंधरा गावातील समाज बांधवांनी उपोषणात सहभाग घेतला असून, रोज वेगवेगळ्या गावांचे समाजबांधव उपोषणास सहभागी होणार आहेत.

जरांगे-पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिल्यास वेळ पडल्यास ममदापूर आणि २६ गावांतून प्रचंड संख्येने मराठा रसद घेऊन मुंबईवर धडक मारू अशी प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. (Maratha Reservation Andolan Chain hunger strike started in Mamdapur with participation of hundreds of Maratha community youth nashik)

तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे राजकीय आणि सामाजिकदृष्टया जागृत असलेल्या ममदापूर गावातून साखळी उपोषणास आजपासून सुरवात झाली.

उत्तर पूर्व भागात मराठा समाजासह धनगर समाज लक्षणीय आहे. या समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही, असे जाहीर केले.

या वेळी एक मराठा लाख मराठा आणि येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. बौद्ध धर्मीय बांधवांनीह पाठिंबा दिला.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. सरकारने आतापर्यंत दोनवेळा जरांगे यांची फसवणूक केली आहे. यापुढेही मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मानसिकता दिसत नाही.

मात्र या वेळी सरकारने दगाफटका केला तर जरांगे यांच्या आदेशानुसार मुंबईच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी ममदापूर आणि २६ गावांतून प्रचंड संख्येने मराठा रसद घेऊन मुंबईवर धडक मारेल, अशी प्रतिज्ञा यावेळी ममदपूर येथे उपस्थित मराठा आंदोलकानी केली.

उत्तर पूर्व भागातील रहाडी, खरवंडी, देवदरी, ममदापूर, रेंडाळे, कोळम खुर्द, कोळम बु. भारम, न्यारखेडे खुर्द, न्यारखेडे बु, वाई बुथी, कोळगाव, सोमठानजोश, राजापूर, भारम, वाघाळे, डोंगरगाव, तळवाडे, सायगाव, गवंडगाव, आडसुरेगाव, भुलेगाव, पिंपळ खुटे , देवठाण, पांजरवाडी, गारखेडे, अंगुलगाव येथील मराठा बांधवांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला.

आंदोलनास प्रारंभ करते वेळी भागवतराव सोनवणे, सयाजी गुडघे, बाळासाहेब दाणे, देविदास गुडघे, समाधान चव्हाण, शाहूराजे शिंदे, श्रावण देवरे, राजाराम शिंदे, झुंजारराव देशमुख, दिनेश पागीरे, सचिन आहेर, प्रकाश गुडघे, नंदुआबा सोमासे, विजय गुडघे, दत्तू वाघ, दीपक गुडघे, गणेश गायकवाड, आप्पा गिडगे,

डॉ हरिश्चंद्र राऊत, भास्कर दाणे, भिकाजी गुडघे, बाळासाहेब वैद्य, आबासाहेब केरे, गोरख वैद्य, जालिंदर जाधव, दादा वाघ, दत्तात्रय वैद्य, जनार्दन जाधव, जालिंदर साबळे, धनंजय गिडगे, दिपक उगले, प्रवीण साबळे, सोन्याबापू वाघ, बबनराव वाघ, अनिल गुडघे, जनार्दन साबळे, लक्ष्मण गिडगे,

नामदेव गुडघे, प्रथमेश पगारे, विलास जाधव, ज्ञानेश्वर वैद्य, दत्तू गुडघे, भाऊसाहेब गरुड, सोपान गुडघे, ज्ञानेश्वर साळे, श्रीहरी साबळे, माधव गुडघे, रामभाऊ जानराव, बाबासाहेब गुडघे, भिमराज सपकाळ, अनिरुद्ध सोमासे, गोरख गुडघे,

योगेश गुडघे, मारोती केरे, दत्तू मते, सुकदेव गुडघे, राजू केरे, दीपक दाणे, ललित उगले, नामदेव पवार, निवृत्ती शिरसाठ, दगू खंडागळे, ज्ञानेश्वर उगले, प्रफुल्ल निंबाळकर, जनार्दन उगले, डॉ. अविनाश विंचू, प्रसाद जाधव, वाल्मीक सोनवणे,

रमेश जानराव, समाधान जानराव, विकी गुडघे, कांतीलाल साबळे, अनिकेत उगले, कार्तिक पगारसह सकल मराठा समाज बांधवांनसह अनेक समाज बांधव, वारकरी संप्रदाय, जय बाबाजी भक्त परिवार उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT