Maratha Reservation andolan Traffic jam on Chandori Highway Strong slogans against government esakal
नाशिक

Maratha Reservation: चांदोरीस महामार्गावर वाहतूक कोंडी; शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

सागर आहेर

चांदोरी : मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी शासनाकडून सुरू असलेल्या चाल ढकल धोरणाच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या गोदाकाठ भागातील सकल मराठा समाज बांधवांनी गुरूवारी (ता. २) नाशिक- छत्रपती संभाजीनगर मार्गावरील चांदोरी त्रिफुली येथे सलग दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. (Maratha Reservation andolan Traffic jam on Chandori Highway Strong slogans against government nashik)

सकाळी दहा वाजता गोदाकाठ भागातील सर्व बांधव एकत्र आले. 'एक मराठा,लाख मराठा','आरक्षण आमच्या हक्काचे', छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा विविध घोषणा देत या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

या चांदोरी त्रिफुलीहुन नाशिक छत्रपती संभाजी नगर व ओझर शिर्डी मार्ग जात आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आहे तेथेच थांबली गेली. थोड्याच वेळात वाहनांच्या रांगा लागल्या. हे आंदोलन अपेक्षेपेक्षा अधिक काळ चालल्याने पोलिसांनी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचा प्रयत्न केला.

प्रांताधिकारी हेमांगी पाटील,तहसीलदार शरद घोरपडे यांनी श्रुष्टी मोगल,गीतांजली रुमणे या मुलींच्या हस्ते निवेदन स्वीकारला नंतर त हे मराठा बांधव निघून गेले व या मार्गावरची वाहतूक सुरळीत सुरु झाली.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

राज्यातील इतर भागातील मराठा आरक्षणाची धग बघता सायखेडा पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश पालवे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, शशिकांत सैंदाणे, बाळासाहेब कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT