maratha reservation esakal
नाशिक

चालता-बोलता : चोर तो चोर, वरून शिरजोर

सकाळ वृत्तसेवा

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात गाजत आहे. आरक्षण म्हटले, की ते सर्वच प्रकारात येते; परंतु नाशिकमध्ये बसमध्ये प्रवास करणाऱ्यांपैकी अनेकांना सिटी बसमध्ये महिला व दिव्यांगांनादेखील आरक्षण आहे हे माहितीच नाही.

ज्यांना माहिती आहे, ते असूनही नसल्यासारखे वागतात. महिला किंवा दिव्यांग बसण्यासाठी आला तरी त्याला जागा देत नाही. उलट त्याला जाब विचारतात. नाशिकच्या सिटीलिंक बससेवेत प्रवास करताना असाच गमतीशीर अनुभव एका दिव्यांगाला आला.

दरवाजाजवळच्या सिटाजवळ आल्यावर सर्वसाधारण व्यक्तीने उठणे अपेक्षित असताना तो उठला नाही. त्याला उठण्याची विनंती केल्यावर त्याने का, असा प्रश्‍न करून हुज्जत घालण्यास सुरवात केली.

दिव्यांगत्वाच्या टक्केवारीपर्यंत वाद गेला. वाद सुरू असतानाच वाहकाने मध्यस्थी केली. मध्यस्थी सुरू असतानाच बसस्थानकावर थांबलेल्या बसमधून वेगाने उतरून पसारदेखील झाला.

दिव्यांगाशी हुज्जत घालणारा फुकटा प्रवासी निघाला. ‘चोर तो चोर, उलटा शिरजोर’ म्हणत वाहकाने डबलबेल मारली. (maratha reservation article chalta bolta nashik)

नेत्यांना गावबंदी, इच्छुकांची कोंडी

काही नेते, पुढाऱ्यांना भारी हौस असते गावभर भटकण्याची. पदावर असताना मोठ्या तोऱ्यात हे गावपुढारी गावात मिरवत होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने, ही गावपुढाऱ्यांची अडचण झाली.

याही परिस्थितीत गावात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी गेल्या वर्षभरापासून इच्छुक गावपुढारी, नेते सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. अगदी वाढदिवस, बारसे यांनादेखील हजेरी लावण्यासाठी या इच्छुकांची कसरत सुरू आहे.

निवडणुका कधी होणार हे माहीत नाही; परंतु चर्चेत राहण्यासाठी या इच्छुकांची गावभर धावपळ सुरू आहे; परंतु मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या गावबंदीमुळे या इच्छुकांची कोंडी झाली आहे.

गावात जायची सोय राहिलेली नसल्याने झालेली ही कोंडी कोणालाही सांगता येत नाही. यासाठी काही इच्छुक मिनी मंत्रालय गाठत आपल्या भावनांना वाट करून देत आहेत.

श्रोत्यांच्या रांगेत नेत्यांची कुचंबना

नेत्यांना गावबंदी झाल्‍याने एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावायची म्हटले, की चार वेळा विचार करावा लागतो. नाशिकमधील अशाच एका नेत्याने रविवारी थोडा वेळ आपले डोके खाजवले आणि आदिवासी समाजाच्या महामेळाव्याला उपस्थित राहण्याचा निर्धार पक्का केला.

नेता घरातून निघाला. स्वत:च्या गाडीतून मेळाव्याच्या ठिकाणी थोड्या उशिरानेच पण त्‍यांच्‍या सवयीप्रमाणे वेळेतच पोचले. समोर भव्य स्टेज जणू त्‍यांची वाटच बघत होता. स्‍टेजवर काही महामंडलेश्वर आणि नेते विराजमान होते.

आता आपल्यालाही बोलवतील, या आविर्भावात हे नेते थोडा वेळ स्टेजभोवती पिंगा घालतात. पण काही केल्या निरोप येईना. मग समोरच प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसले.

पण स्टेजची सवय झालेल्या या नेत्याचे श्रोत्यांच्या रांगेत काही केल्‍या मन रमेना. शेवटी कानाला फोन लावून त्‍यांनी भरसभेतूनच काढता पाय घेतला.

बाईंना चहा-पाणी विचारा..!

दहा-पंधरा मिनिटे सातत्‍याने कुणी बोलत राहिले तर घशाला कोरड पडणे स्‍वाभाविकच आहे. मग अशा वेळी पाण्याची तहानदेखील लागते. भाजीविक्रेत्‍या दुकानात घशाला कोरड लावणारा विनोदी किस्सा नुकताच घडला.

झाले असे, रविवारचा दिवस असल्‍याने दुकानात ग्राहकांची प्रचंड गर्दी होती. पाटी भरून भाज्‍या खरेदीची लगबग सुरू होती. भाजी मोजणी करून पैसे अदा करण्यासाठी ग्राहकांची रांग लागलेली होती.

सध्याच्‍या तंत्रज्ञानाच्‍या जमान्‍यात यूपीआय पेमेंटचे प्रमाण वाढतेय. अशात दुकानदाराकडेही यूपीआय क्युआर कोड होता अन्‌ पैसे प्राप्त झाल्‍याची माहिती देणारे आधुनिक स्‍पीकरही होते. ग्राहक एकामागे एक कोड स्‍कॅन करून पैसे अदा करत जात होते.

त्‍यामुळे स्‍पीकरवरही एकामागे एक पैसे प्राप्त झाल्‍याची सूचना महिलेच्‍या आवाजात येत होती. इतक्‍यात रांगेत उभा एक युवक म्‍हणाला, ‘‘शेठ, बाई बोलून बोलून थकल्‍या असतील, काही चहा-पाणी तरी विचारा.’’

क्षणभर कुणालाच काही कळालं नाही, पण स्‍पीकरवरील आभासी बाईंच्‍या काळजीत युवक बोलतोय, हे लक्षात आल्‍यानंतर उपस्‍थित ग्राहक अन्‌ व्‍यावसायिक यांच्‍यात हशा पिकला.

चर्चा तर होणारच ना!

मराठा आरक्षणावरून राज्यभर तणावाचे वातावरण असताना, सोशल मीडियावरही त्यावरून ना-ना संदेश व्हायरल झाले. मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दर्शविण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी राजीनामास्त्राचे हत्यारही उपसले आहे.

असाच प्रकार नाशिकच्या खासदारांनी केला. अगदी राजीनामा दिल्याचे पत्रच सोशल मीडियावर व्हायरल केले. सोशल मीडियावर खासदारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल होताच, त्यावर मजेशीर कमेंटही येऊ लागल्या.

कारण, खासदारांनी त्यांचा राजीनामा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कायम पडीक असणाऱ्यांनीही नेहमी हीच बाब हेरून, राजीनामानाट्याच्या त्रुटी काढत सोशल मीडियावर राजीनामा कोणी कोणाला, कसा द्यायचा असतो, याच्या पुराणकथाच सुरू झाल्या.

काहींनी तर खासदारांच्या राजीनाम्याची ‘पोलखोल’ करीत यातून खासदारांनी कशी स्टंटबाजी केली इथपर्यंत चर्चा घडवून आणली. सोशल मीडिया म्हणजे काय, विषय कोणताही असो.. चर्चा तर होणारच!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT