जुने नाशिक : मराठा आरक्षण संदर्भात सरकारने कुणबी नोंदी तपासण्याचे आदेश पारित केले होते. महापालिका पूर्व विभागात पुरातन जन्म मृत्यू नोंदणी आहे.
त्यानिमित्ताने विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ७ ते १७ नोव्हेंबर अशा १० दिवसात ४४ लाख १ हजार ४२२ नोंदींची तपासणी केली.
त्यात ३३ लाख ५ हजार ४५८ जन्म, तर १० लाख ५ हजार ९६४ मृत्यू नोंदीचा समावेश आहे. या सर्व नोंदी १९६७ पूर्वीच्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. (Maratha Reservation kunbi records Verification of 44 lakh records in Eastern Division nashik)
पूर्व विभागात अशाच प्रकारच्या १८९७ पासून मोडी लिपीतील नोंदी आहे. १९३३ पर्यंत मोडी लिपीतील नोंदी असून १९३४ पासून ते १९६८ पर्यंत देवनागरी अर्थात मराठी लिपीतील संपूर्ण नोंदी आहे.
त्यामुळे विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक चंदन घुगे तसेच श्री. कळमकर, सोज्वळ साळी यांच्यासह जन्म मृत्यू विभागातील अन्य अधिकारी कर्मचारी गेल्या १० दिवसात कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा तिन्ही प्रकारच्या नोंदी शोधून काढल्या.
१० दिवसात ४४ लाख १ हजार ४२२ नोंदींची तपासणी केली. त्यात ३३ लाख ५ हजार ४५८ जन्म तर १० लाख ५ हजार ९६४ मृत्यू नोंदणी आढळून आल्या. १९६७ पूर्वीच्या नोंदी असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
तपासणी करण्यात आलेल्या नोंदीत ६ हजार ६७ कुणबी, ७५ मराठा कुणबी तर २३ कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या. आहे. १८९७ ते १९६७ पर्यंतच्या मोडी आणि देवनागरी लिपीतील नोंदणीची तपासणी करण्यात आली.
जीर्ण रजिस्टरचे होणार स्कॅनिंग
मोडी लिपीतील नोंद असलेले रजिस्टर अतिशय जुने झाले आहे. त्यांचे पाने जीर्ण होऊन गळून पडलेली आहेत. कर्मचाऱ्यांना नोंदी तपासण्यात अडचण येत आहे. भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पूर्व विभागात असलेल्या संपूर्ण नोंदीचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे.
सध्या शोध घेण्यात आलेल्या नोंदणीचे स्कॅनिंग करण्यात येऊन सर्व माहिती जतन करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात स्कॅनिंगला सुरवात होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.