nashik Maratha Reservation Protest esakal
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक व राजकीय आरक्षण फेटाळल्याने समाजात अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (ता.२१) गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारील पटांगणावर मूक आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलन होत असून पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या मोर्च्याला उपस्थित आहेत.
छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली (ता.२१) मूक आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी कोणती भूमिका मांडतात, याबाबत मोठी उत्सुकता आहे.माझ्या पक्षाची आणि माझी भूमिका एकचं आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे - छगन भुजबळमराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलनाची जागा पुण्य आहे. उदोजी मराठा बोर्डिंग उभारणीत छत्रपती शाहू महाराज यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे एक चांगली सुरुवात येथून होत आहे. आमदार-खासदारांना संदर्भ व क्रांती मोर्चाच्या वतीने केले आहे. लोकप्रतिनिधी आमच्या विनंतीला मान देऊन आले आहे. त्यामुळे पक्षाबाबत काही न बोलता समाजाची जबाबदारी घेऊ शकता एवढीच आमची इच्छा आहे. - खासदार संभाजीराजे. या आंदोलनात जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी कोणती भूमिका मांडतात, याबाबत मोठी उत्सुकता आहे. ज्या ठिकाणी आंदोलन पार पडत आहे. तिथे प्रवेशद्वारावरच बैरिकेटींग करण्यात आले असून येणाऱ्या आन्दोलकांची तपासणी आंदोलन मूक असल्यानं कोणीही घोषणाबाजी करू नये आशा स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. आंदोलना नंतर समन्वयक बैठक घेतली जाणार आहे.नाशिकमध्ये आज (ता.२१) मराठा मूक आंदोलनासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 20 अधिकारी आणि 150 कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात असून आंदोलनावर नजर ठेवत आहेत. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.