Gyandev Padalkar esakal
नाशिक

मनमोकळं : ‘महावितरण आपलीच’ या भावनेने अनावश्यक वीजवापर टाळा!

सकाळ वृत्तसेवा

"‘महावितरण’ ही जनतेची कंपनी आहे. ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर सेवा देणारी आहे, ही आपल्यासाठीच आहे, असे समजून प्रत्येक ग्राहकाने वेळेत वीजबिल भरावे. ‘महावितरण’ला सहकार्य म्हणजे स्वतःला सहकार्य केल्यासारखेच आहे, अशी भावना बाळगावी. विजेची बचत करताना एक युनिट वाचविणे म्हणजेच एक युनिट निर्माण करणे होय. अनावश्यक वीजवापर टाळावा. विजेसंदर्भात वेळोवेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले."- निखिलकुमार रोकडे

(marathi article Avoid unnecessary electricity consumption with the feeling of Mahavitran Aapitaran nashik)

१) आतापर्यंतचा प्रवास सांगा.

मी मूळचा सांगली जिल्ह्यातील होय. १९९४ मध्ये वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल शाखेतून पदवी पूर्ण केली. ‘डिप्लोमा इन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट’ वेलिंगकर इन्स्टिट्यूट (माटुंगा, मुंबई)मध्ये केला.

शिक्षणानंतर तीन वर्षे बिर्ला ग्रुपमध्ये नोकरी केली. १९९७ मध्ये ‘महावितरण’ म्हणजेच पूर्वीच्या ‘एमएसईबी’मध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर नोकरी सुरू केली.

पुढे उपअभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता या पदांवर सांगली, कोल्हापूर, कोथरूड (पुणे शहर) या ठिकाणी कार्यरत होतो. २०१७ मध्ये सरळ सेवा खात्यांतर्गत अधीक्षक अभियंतापदी निवड झाली. २०२१ पर्यंत सोलापूर येथे कार्यरत होतो. शासकीय सेवेत असतानाच एमबीए पूर्ण केले.

२) सध्या आपणाकडे कोणती जबाबदारी आहे?

ऑगस्ट २०२१ पासून नाशिकमधील चांदवड, निफाड, दिंडोरी, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, सिन्नर व नाशिक महापालिका क्षेत्र या परिसराची जबाबदारी माझ्याकडे आहे. ११५९ उच्चदाब म्हणजेच हायटेन्शन, घरगुती, शेती, औद्योगिक व व्यापारी असे १२ लाख ग्राहक माझ्या कार्यक्षेत्रात आहेत.

जवळपास दोन हजार ५०० अधिकारी व कर्मचारी वर्ग वीज ग्राहकांना अविरत सेवा देत आहेत. मासिक महसूल ३६० कोटी रुपये आहे. दर महिन्याला जवळपास ४२५ दशलक्ष युनिट वीज आमच्या मार्फत पुरवली जाते.

३) वीज कपात व भारनियमनाबद्दल सांगा.

विजेची मागणी व पुरवठा यात कुठल्याही प्रकारची तफावत नाही. विजेच्या निर्मितीबाबत आपण स्वयंपूर्ण आहोत. जेवढी मागणी आहे. तेवढी वीज आपल्याकडे उपलब्ध आहे. भारनियमनु बंद आहे.

अगदी अपवादात्मक परिस्थितीत काही तांत्रिक अडचण अथवा पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कधी-कधी वीज सेवेत खंड निर्माण होतो. याचा अर्थ वीज कपात अथवा भारनियमन सुरू आहे, असा नाही.

४) वीज बचत व बिल याबद्दल सांगा.

वीजबिलाबद्दल ग्राहकांनी कुठलाही गैरसमज बाळगू नये. आपल्या वापराप्रमाणेच वीजबिल येते. फोटो मीटर रीडिंग आहे. त्यामुळे त्यात जे दर्शविले आहे, ते योग्यच आहे. वातावरणातील होणारे बदल यामुळे घरातील विजेच्या उपकरणांचा कमी-अधिक प्रमाणात वापर होतो.

त्यामुळे बिल कमी-अधिक स्वरूपात येऊ शकते. विजेचा वापर करताना एलईडी दिवे वापरावेत. पंखे, वॉशिंग मशिन, फ्रीज, दूरचित्रवाणी संच यांसारख्या वस्तू वापरताना फाइव्ह स्टार कॅटेगिरीतील असणाऱ्याच वापराव्यात, जेणेकरून वीज कमी वापरली जाईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

५) वीजचोरी व नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

वीजचोरीबद्दल नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. वीजचोरी विशेष करून आकडे न टाकता रीतसर कनेक्शन घ्यावे. सुरक्षिततेच्या बाबतीत सतर्क राहावे. आर्थिंग, आयएसआय मार्क असलेली उपकरणे वापरावीत.

ओपन जॉइंट ठेवू नये. सार्वजनिक ठिकाणी अथवा खासगी परिसरात ‘महावितरण’च्या संबंधित उपकरणांमध्ये काही अडचणी जाणवत असतील. उदाहरणार्थ- विजेचे खांब वाकलेले, कमी उंची अथवा तुटलेल्या तारा, ओपन डीपी, कुठे स्पार्किंग होत असेल तर तत्काळ जवळच्या आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

६) नागरिकांना काय संदेश द्याल?

वीज कनेक्शनसंदर्भात कुठलेही काम असेल तर कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. ‘महावितरण’चे अधिकृत मोबाईल ॲप आहे. प्रत्येक ग्राहकाने डाउनलोड करावे.

यात तक्रार नोंदविणे, नवीन कनेक्शन, ऑनलाईन बिल पेमेंट व कॉपी अशा अनेक सेवा या ॲपवर उपलब्ध आहेत. प्रत्येकाला समजेल अशा पद्धतीने या ॲपची निर्मिती करण्यात आली. ऑनलाईन सेवांचा लाभ घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT