Former MLA Anil Kadam, Pramod Kute during meeting esakal
नाशिक

Market Committee Election : प्रभावी युक्तीवादानंतरही पिंपळगांवला 15 अर्ज बाद

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगांव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगांव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांच्या बुधवारी (ता. ५) झालेल्या छाननीत विविध कारणांवरून १३ उमेदवारांचे १५ अर्ज बाद ठरविण्यात आले.

दरम्यान, बाद झालेल्या अर्जांवर या वेळी जोरदार युक्तीवाद झाला. मात्र, निवडणुक निर्णय अधिकारी अर्चना पठारे यांनी अपात्रतेचा निकाल कायम ठेवल्याने आता २९४ अर्ज वैध ठरले आहेत. (Market Committee Election 15 applications rejected for Pimpalgaon despite effective arguments nashik news)

बाजार समिती सभागृहात झालेल्या अर्ज छाननीवेळी आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नव्या सहा सोसायट्यांच्या अस्तित्वाच्या वादाची किनार अर्ज छाननीतही दिसली. नव्याने झालेल्या सहा सोसायट्यांच्या संचालकांनी सुचक व अनुमोदक म्हणुन स्वाक्षरी केलेले चार अर्ज बाद ठरविण्यात आले.

या निर्णयावर आमदार बनकर यांच्या वतीने प्रमोद कुटे यांनी प्रभावीपणे बाजु मांडली. अंतिम यादीत नावे कायम असताना व जिल्हा निबंधकांनी ती नावे अद्याप वगळुन नव्याने अंतिम यादी प्रसिद्ध केलेली नसल्याने संबंधीत संचालकांना सुचक-अनुमोदक म्हणुन ग्राह्य धरावे व हे चारही अर्ज मंजुर करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तर माजी आमदार कदम यांच्या गटाकडुनही त्यांच्या वकीलांनी प्रभावीपणे बाजु मांडताना, ‘ती’ नावे वगण्यात आल्याने चार उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याचा निकाल कायम ठेवावा, असा मुद्दा मांडला. माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ, शोभा घोलप, ज्ञानेश्‍वर बागुल, प्रताप पवार, अनुपमा जाधव, सुभाष पवार यांच्यासह १३ जणांचे १५ अर्ज दहा गुंठे क्षेत्रासह विविध कारणांनी बाद ठरविण्यात आले.

दरम्यान, अर्ज छाननीत कोणत्याच गटाने फारसे आक्षेप घेतले नाही. त्यामुळे निवडणुक अत्यंत चुरशीची होणार असली, तरी छाननीत मात्र सौहार्दाचे वातावरण दिसले. माजी आमदार श्री. कदम, सरपंच भास्करराव बनकर, दिलीप मोरे, प्रणव पवार, अमृता पवार, राजेश पाटील, आमदार बनकर गटाकडुन सुभाष होळकर, नंदु सांगळे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT