Election News esakal
नाशिक

Market Committee Election: बाजार समितीच्या उमेदवारांना आता खर्चाची मर्यादा;...अन्यथा फौजदारी कारवाई होणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी आचारासंहिता लागू केल्यानंतर आता उमेदवारांना निवडणूक खर्चाचे बंधन टाकण्यात आले आहे. सहकार प्राधिकरणाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीत करावयाच्या खर्चाची कमाल मर्यादा निश्चित केली आहे.

यात नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या तालुकास्तरीय असल्याने, त्या उमेदवारांना एक लाखाची किमान मर्यादा असणार आहे. उमेदवारांने केलेला खर्च प्रपत्र- ‘अ’मधील नमुन्यात ६० दिवसांच्या आत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे.

तसेच उमेदवारांनी खर्च सादर न केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाईदेखील केली जाणार आहे. (Market Committee election candidates now have limit on expenses otherwise criminal action will taken nashik news)

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या निवडणुकांचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण करण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपविण्यात आली आहे.

यामुळे निवडणुकीत संबंधित उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज, प्रतिभूती ठेव, मतदार याद्यांची खरेदी, प्रचार मोहिमेसाठी कार्यालय भाडे, व्यक्तिगत माहितीपत्रक, भित्तिपत्रक, हस्तपुस्तिका जाहिरात प्रसिद्धी, सार्वजनिक सभा प्रचार, सार्वजनिक सभेसाठी मंडप,

सार्वजनिक सभेसाठी जागा, सार्वजनिक ध्वनिक्षेपक, छायाचित्र, चित्रीकरण, ध्वनिमुद्रित कॅसेट, वाहनभाडे, वाहनाकरिता पेट्रोल वंगण, निवडणूक प्रतिनिधींना दिलेले परिश्रमिक व अल्पोपाहार, मतमोजणी प्रतिनिधीना दिलेले परिश्रमिक व अल्पोपाहार व इतर अनुषांगिक बाबींवर खर्च केला जात आहे.

त्यामुळे या खर्चाची कमाल मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे, यासाठी सहकार प्रधिकरणाने निवडणूक आचारसंहिता तसेच उमेदवार निवडणूक खर्च याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्यास मान्यता मिळाली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारांनी करावयाची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यतक्षेत्र सहा लाख, विभागीय कृषी उत्पन्न बाजार समिती चार लाख, प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती दोन, तर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एक लाखाची मर्यादा आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकार उमेदवाराने करावयाच्या खर्चाची मर्यादा

कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई सहा लाख

विभागीय कृषी उत्पन्न बाजार समिती चार लाख

प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती दोन लाख

तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती एक लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT