election esakal
नाशिक

Market Committee Election : माघारीसाठी नेतेमंडळाची फिल्डींग, दबावतंत्र; माघारीसाठी केवळ 4 दिवस शिल्लक

सकाळ वृत्तसेवा

Market Committee Election : जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांची रणधुमाळी सुरू आहे. यंदा सर्व बाजार समित्यांसाठी तब्बल २ हजार २७७ अर्ज दाखल झाले आहेत. बाद अर्जावर अपील दाखल करण्यासाठी मुदत संपल्यानंतर माघारीस सुरवात झाली आहे.

मात्र, एकाही बाजार समितीत फारशा माघारी झालेल्या नाहीत. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांकडून माघारीसाठी फिल्डींग लावली जात आहे.

माघारीसाठी पुढील आठवड्यातील केवळ चार दिवस शिल्लक राहिल्याने अनेक ठिकाणी दबावतंत्राचा वापर करून अन्य ठिकाणी तडजोडी सुरू असल्याचे नेतेमंडळीकडून सुरू असल्याचे बघावयास मिळत आहे. (Market Committee Election Fielding of leadership for withdrawal pressure technique Only 4 days left for withdrawal nashik news)

जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी, कळवण, सुरगाणा, देवळा, चांदवड, मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, घोटी या बाजार समित्यांचे धुमशान सुरू झाले आहे.

अर्ज छाननी झाल्यानंतरच ज्यांचे अर्ज वैध ठरले आहेत व आश्वासने दिल्यानंतर जे जाळ्यात सापडतील, त्यांच्यावर डाव टाकला जात आहे. फोनाफोनी व ऑन द स्पॉट भेटी घेऊन माघारीसाठी विनवण्या केल्या जात आहेत.

जिल्ह्यातील महाविकास आघाडीत फूट पडली आहे. आपल्या सोयीने राजकारण करत प्रत्येक तालुक्यात सुरू आहे. या सोईच्या राजकारणामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्येही अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे.

त्यामुळे बंडखोरी शमवण्याबरोबरच माघारीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे सुरू आहेत. नेत्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांसमोर ठाकले गेले असल्याने समजूत काढताना नेत्यांची मोठी कसरत होत आहे.

यामुळे आपल्याच कार्यकर्त्यांना सावरता सावरता नेत्यांच्या नाकी नऊ येवू लागले आहे. माघारीपूर्वीच अनेकांच्या रस्त्यांमधील काटे काढण्यासाठी नेतेमंडळी जोर लावू लागले आहे. सत्ताधाऱ्यांकडून साम, दाम, दंड, भेद या सर्व गोष्टींचा वापर माघारीसाठी केला जात आहे.

माघारीसाठी केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे नेतेमंडळींनी फिल्डींग लावण्यास सुरवात केली आहे. पुढील उमेदवार कोणाचा शब्द मोडणार नाही अंदाज घेऊन माणसे शोधली जात आहे.

तसेच गावातील इतर नेते, पुढारी व सदस्यांकरवी निरोप धाडले जात आहे. काही ठिकाणी पक्षातील जिल्हाध्यक्ष, महत्त्वाचे नेते व पदाधिकाऱ्यांना फोन लावून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे अनेक बंडखोरांना या निवडणुकीचे आमिष दाखवून माघार घेण्यासाठी समजूत काढली जात आहे.

मला काय ?

पिंपळगाव बसवंत, नाशिक, लासलगाव ह्या महत्त्वाच्या असलेल्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज दाखल आहेत. त्यामुळे या तालुक्यांमध्ये नेतेमंडळींची डोकेदुखी आणखी वाढली आहे. माघारीसाठी फोन आल्यानंतर मला काय ? असा प्रश्न उमेदवारांकडून केला जात आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ताकद नसणाऱ्यांचेही वाढले वजन

अनेक बाजार समित्यांमध्ये ज्यांचा सहकाराशी काडीमात्र संबंध नाही त्यांच्याकडूनही अर्ज दाखल करण्यात आले आहे. ज्यांना फारशी मते पडणार नाही, अशा उमेदवारांनाही नेते मंडळींना गळ घालावी लागत आहे.

तसेच ज्या मतदारसंघामध्ये कमी अर्ज शिल्लक राहिले आहेत, त्या मतदारसंघामध्ये माघारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे. ज्यांची मतदारसंघात ताकद आहे ते नेतेमंडळींना डावलत आहेत. अर्थाने माघार सुरू झाली आहे. अनेक तर ज्यांची ताकद नाही ते आपल्याला काय मिळते का? याची प्रतिक्षा करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT