election esakal
नाशिक

Market Committee Election : आतापर्यंत 9 उमेदवारी अर्ज माघारी; आज शेवटचा दिवस

सकाळ वृत्तसेवा

Market Committee Election : नाशिक बाजार समिती निवडणूक चांगलीच रंगतदार चालली आहे. छाननीनंतर ग्रामपंचायत व सहकारी संस्था गटातून मंगळवारी (ता. १८) चार, तर बुधवारी (ता. १९) पाच, असे चौदा दिवसात आतापर्यंत एकूण नऊ उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे.

गुरुवारी (ता. २०) माघारीचा शेवटचा दिवस असून, कोणत्या गटातून माघारी घेईल व घ्यायला लावणार, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. (Market Committee Election nine candidature applications been withdrawn today last day nashik news)

नाशिक बाजार समिती निवडणुकीत आजी- माजी खासदार नव्हे तर महाविकास आघाडी व भाजप शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढत होणार आहे. बुधवारी छाननीत १३७ उमेदवारी अर्ज वैध ठरले. गुरुवार (ता.२०) पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी मुदत आहे.

बुधवारी ग्रामपंचायत गटातून सर्वसाधारण व आर्थिक दुर्बल गटातून रंजना भाऊसाहेब खांडबहाले यांचा प्रत्येकी एक अर्ज व सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून शांताराम रामदास माळोदे, सुरेश रामचंद्र बोराडे, सहकारी संस्था इतर मागास वर्ग गटातून निवृत्ती विठोबा अरिंगळे, यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.

खर्चाची कमाल मर्यादा एक लाख

तालुकास्तरीय बाजार समितीसाठी निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक काळात खर्चाची कमाल मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत घालून देण्यात आली आहे. तालुकास्तरीय बाजार समितीसाठी ही कमाल मर्यादा आहे. यामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून मतमोजणी होईपर्यंत होणारा खर्च सादर करावा लागणार आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

पॅनलनिर्मिती माघारी नंतरच

नाशिक बाजार समितीवर आपली सत्ता आणण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे, परंतु दोन्ही गटांनी आपले पॅनल तयार केलेले नाही. २० एप्रिलपर्यंत माघार असून, त्यानंतरच पॅनल निर्मितीला वेग येणार आहे. परंतु दोन्हीकडून एकमेकांच्या इच्छुकांवर डोळा ठेऊन आहे.

त्यामुळे पॅनल निर्मितीबाबत दोन्ही गट अद्यापतरी शांत आहे. अद्याप एकही उमेदवाराने माघार घेतली नाही. माघार मुदतीच्या शेवटच्या दोन दिवसात माघारीचे अर्ज सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT