The ongoing process of withdrawal of candidates for the market committee elections here. esakal
नाशिक

Market Committee Election: पिंपळगावला काट्याची लढत; आ. बनकर व माजी आ. कदम यांच्या गटातर्फे उमेदवारांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

Market Committee Election : पिंपळगाव बाजार समितीच्या रणधुमाळीचे चित्र आज स्पष्ट झाले. १८ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. आमदार दिलीप बनकर यांच्या शेतकरी विकास व माजी आमदार अनिल कदम यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनेलमध्ये काट्याची लढत रंगणार आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी ग्रामपंचायत गटात अपक्ष उमेदवारी करून व्टिस्ट आणले आहे. तुल्यबळ उमेदवार पाहता न भुतो...असा रणसग्रांम पिंपळगांव बाजार समितीच्या निवडणुकीचा होण्याची चिन्ह आहे. दरम्यान, माघारीच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. (Market Committee Election Pimpalgaon mla Bankar and former mla Kadams Announcement of candidates nashik news)

अंतिम दिवशी बहुतांश इच्छुकांनी आपल्या तलवारी म्यान केल्या. आमदार बनकर व माजी कदम आपल्या गटातील इच्छुकांच्या माघारी मिळविताना चांगलीच दमछाक झाली. अनेक जण उमेदवारीसाठी तर काही तडजोडी, भविष्यातील निवडणुकीचा शब्द घेऊन माघारी देण्यास राजी झाले.

मोठ्या रंजक घडामोडी घडल्या. मुदतीनंतर येणाऱ्या माघारीवरून दोन्ही गटात काही वेळ हमरीतुमरी झाली. आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, सरपंच भास्करराव बनकर हे माघारी दरम्यान बाजार समितीलगतच तळ ठोकून होते.

पण दोन्ही गटाचे उमेदवार अगोदरच निश्‍चीत असल्याने पॅनलचे चेहरे तेच राहिले. तोडीस तोड उमेदवार देत आमदार बनकर व माजी आमदार कदम यांनी निवडणूक एकतर्फी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

व्होटबॅक पाठिशी असलेल्या इच्छुकांनाच दोन्ही गटात संधी मिळाल्याचे दिसत आहे. पक्षाऐवजी नातगोते, गटतटाचे राजकारण याही निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.

यतीन कदमासह दोघे अपक्ष

भाजपकडून तिसऱ्या पॅनलची शक्यता हवेत विरली. पण यतीन कदम यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून शड्डू ठोकले आहे. त्यामुळे येथे चुरस बघायला मिळेल.

चंद्रभान बोरस्ते, दिलीप मोरे हे सोसायटी गटात अपक्ष उमेदवार आहेत. वेळत अर्ज माघार न दिल्याने सुरेश पारख यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला.

शेतकरी विकासचे उमेदवार असे

सोसायटी गट- दिलीप बनकर, दीपक बोरस्ते, रामभाऊ माळोदे, ज्ञानेश्‍वर शिरसाठ, भाऊसाहेब घोलप, नंदकुमार सांगळे, बबन जगताप, एन.टी.गट- जगन्नाथ कुटे, महिला राखीव- मनीषा शिंदे, मनीषा खालकर, ओबीसी गट- विजय कारे, ग्रामपंचायत गट- सुभाष होळकर, शिरीष गडाख (सर्वसाधारण गट), महेद्र गांगुर्डे (अनुसूचित जाती-जमाती), शरद काळे (आर्थिक दुर्बल), हमाल-मापारी गट- नारायण पोटे, व्यापारी गट-सोहनलाल भंडारी, शंकर ठक्कर

लोकमान्य परिवर्तन पॅनेलचे उमेदवार

सोसायटी गट- अनिल कदम, डॉ. प्रल्हाद डेर्ले, प्रभाकर कुयटे, बाबाजी कुशारे, दौलत कडलग, केशव बोरस्ते, गोकुळ गिते, महिला गट- अमृता पवार, निता भुसारे, ओबीसी गट- दिलीप मोरे, एन.टी.गट- भगवान सानप, ग्रामपंचायत गट- भास्करराव बनकर, संदीप गडाख(सर्वसाधारण), राजेश पाटील (आर्थिक दुर्बल), किरण निरभवणे (अनुसूचित जाती-जमाती गट), दीपक मोरे (हमाल मापारी गट), व्यापारी गट- योगेश ठक्कर, अतुल शाह.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

दोन्ही गटांकडून समतोल

उमेदवारी देताना सामाजिक व गोदाकाठ, बाणगंगा व पिंपळगाव परिसराचा समतोल दोन्ही गटांनी साधलेला दिसतो. आमदार बनकर व माजी आमदार कदम यांच्यासाठी विधानसभेची लिटमस टेस्ट

असणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्यापासून कार्यक्षेत्रात प्रचाराचा धुऱळा उडणार आहे. बनकर व कदम यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक तितकीच श्रीमंत होणार असल्याने कोटीच्या कोटी उड्डाणे होणार हे उमेदवारांवरून स्पष्ट होते.

"गेल्या तेवीस वर्षाच्या कार्यकाळात पिंपळगाव बाजार समितीचा नावलौकीक देशभर पोहचविला. संस्थेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला याची जाणीव मतदारांना आहे. सर्वमान्य उमेदवार दिल्याने शेतकरी विकास पॅनलचा विजय निश्‍चित आहे."

- दिलीप बनकर, आमदार.

"मतदारांमध्ये बाजार समितीच्या सत्तेत परिवर्तनाची मानसिकता झाली आहे. जनाधार असलेले तोलामोलाचे उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे."

- अनिल कदम, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT