Dada Bhuse vs Advay Hirey esakal
नाशिक

Market Committee Election: मालेगावला हिरे- भुसे पॅनलमध्ये सरळ लढत; 18 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

Market Committee Election : येथील बाजार समितीच्या १८ जागांसाठी ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी २०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या मुदतीत तब्बल १५६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

निवडणुकीत पालकमंत्री दादा भुसे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. निवडणुकीत काही अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. (Market Committee Election Straight fight in Malegaon hiray bhuse pane 46 candidates in competition for 18 seats nashik news)

बाजार समिती निवडणूक पालकमंत्री भुसे व युवानेते हिरे या दोघा नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. दोघा नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन आपापले उमेदवार जाहीर केले. यामुळे शहरात दिवसभर माघारनाट्य सुरु होते. इच्छुक उमेदवारांची मनधरणी करण्यात किरकोळ अपवाद वगळता दोन्ही नेत्यांना यश आले आहे.

यावेळी उमेदवार घोषित करताना पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकरी, व्यापारी, कामगार व बाजार समितीवर अवलंबून असलेल्या सर्व घटकांशी समन्वय साधून त्यांच्या विविध सूचना व मार्गदर्शन घेत बाजार समिती विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

समितीत भाजीपाला, फळफळावळ विभागात रस्ते, स्वच्छतागृह, शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्था, भूमिगत गटार, समितीच्या मुंगसे, झोडगे, निमगाव या उपकेंद्रात सुविधा व विस्तार करणाऱ्यावर आमचा भर असेल. बाजार घटकांच्या हितासाठी ‘आपलं पॅनल’ची निर्मिती आहे. असल्याचे स्पष्ट केले.

दुसरीकडे अद्वय हिरे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा करत शहरातील कॅम्प रस्त्यावर असलेल्या विद्यमान बाजार समिती आवारात अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे. या समितीत शेतकरी, व्यापाऱ्यांसह बाजार घटकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. आगामी काळात शहराबाहेर नवीन जागा खरेदी करुन बाजार समिती उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

चार विद्यमान संचालकांना उमेदवारी

पालकमंत्री दादा भुसे यांच्या आपलं पॅनलमध्ये मावळते सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, संचालक संजय घोडके व यापूर्वी अद्वय हिरे गटात असलेले अमोल शिंदे या चौघा संचालकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

विरोधी गटातील श्री. हिरे यांच्यासह पाच विद्यमान संचालक निवडणूक रिंगणात असून उर्वरित बहुसंख्य तरुण उमेदवार आहेत. व्यापारी व हमाल मापारी गटातून श्री. हिरे यांनी उमेदवार जाहीर केले नाहीत. पुढील दोन दिवसात ते भूमिका स्पष्ट करणार आहेत.

आपलं पॅनलचे गटनिहाय उमेदवार

सोसायटी गट : सर्वसाधारण : मधुकर हिरे, सुरेश पवार, विश्वनाथ निकम, राजेंद्र जाधव, एकनाथ लामखेडे, अमोल शिंदे, दिनेश ठाकरे.

सोसायटी गट : इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) : चंद्रकांत धर्मा शेवाळे

भटक्या विमुक्त जाती/जमाती : अशोक दासनुर

महिला राखीव : शोभाबाई राजेंद्र पवार, भावना निळकंठ निकम

ग्रामपंचायत, सर्वसाधारण गट : राजेंद्र पवार, कृष्णराव ठाकरे, सुनील देवरे (आर्थिक दुर्बल घटक), बापू मोरे (अनुसूचित जाती,जमाती), भिका कोतकर, संजय घोडके (व्यापारी गट), समाधान सूर्यवंशी (हमाल-मापारी गट)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल

सोसायटी गट :

अद्वय हिरे, सुभाष सूर्यवंशी, रवींद्र मोरे, विनोद चव्हाण, संदीप पवार, राजेंद्र पवार, उज्जैन इंगळे.

सोसायटी गट इतर मागास वर्ग : युवराज गोलाईत.

भटक्या विमुक्त जाती जमाती : नंदलाल शिरोळे.

महिला गट : मिनाक्षी देवरे, भारती बोरसे

सर्वसाधारण : रत्ना पगार, रवींद्र सूर्यवंशी

ग्रामपंचायत : रवींद्र निकम (आर्थिक दुर्बल घटक), अरुणा सोनजकर (अनुसूचित जाती,जमाती),

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT