Nashik Agricultural Produce Market Committee esakal
नाशिक

Nashik Market Committee Election : गुंता वाढल्याने माघारीकडे नजरा! निवडणुकीत प्रचंड चुरस

सकाळ वृत्तसेवा

Nashik Market Committee Election : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांच्या निवडणुकीसाठीचे वातावरण चांगले तापले आहे. अद्यापही पॅनल निर्मितीसह उमेदवार निश्चितीचा घोळ दोन्ही बाजूने सुरू असल्याने अधिकृतपणे पॅनल जाहीर झालेले नाही. (Market Committee Election today on last day attention to withdrawal of candidates Nashik news)

त्यामुळे आज (ता.२०) माघारीच्या अंतिम घडामोडीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान आतापर्यंत विविध गटातून २५ जणांनी माघारी घेतले असून आज शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज मागे होण्याची शक्यता आहे.

येथील बाजार समितीच्या १८ जागांसाठी २१७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना ठाकरे गट, भाजप, शिवसेना शिंदे गटातर्फे इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. एकाही राजकीय पक्षांने अद्याप पॅनेलची घोषणा केलेली नसल्याने कुठला उमेदवार कुठल्या पॅनलकडून उमेदवारी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांचा एक पॅनल होणार असल्याचे स्पष्ट आहे. दुसऱ्या बाजूला भाजप- ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे व मित्र पक्षांचा पॅनल रिंगणात उतरणार आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

या सर्व प्रक्रियेत शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांचे व राष्ट्रवादीचे सूत्र जुळलेले नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. सध्या दोन्ही बाजूने हक्काची मते असलेल्या उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली असली तरी अधिकृतपणे पॅनलची घोषणा झालेली नाही, त्यामुळे नेमके घोडे अडले कुठे हे उद्याच समजणार आहे.

आता ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, अशा दोन्ही गटाच्या उमेदवारांचा गावनिहाय प्रचार दौरा सुरू आहे. विशेषता पहिल्या टप्प्यात गावोगावी जाऊन ग्रामपंचायत व सोसायटी सदस्यांना घरोघरी जाऊन भेटण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. माघारीनंतर केवळ सातच दिवसाचा कालावधी प्रचाराला मिळणार असल्याने चिन्ह मिळाल्यानंतर पुन्हा दुसरा दौरा करण्याचे नियोजन उमेदवारांनी केले आहे.

या सर्व निर्मितीच्या गोंधळात मात्र कोणत्या गटात कोण उमेदवार उभा राहणार याकडे दोन्ही पॅनलचे लक्ष लागून आहे. तालुक्याचेही राजकीय घडामोडीकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीवर आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे अंदाजआडाखे देखील जुळले जाणार असल्याने नेते मंडळी जोमाने कामाला लागल्याचे दिसते अर्थात स्पष्ट चित्र उद्या माघारीनंतरच दिसून येणार असल्याने राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

बाजार समितीसाठी सोसायटी गटात सर्वसाधारण सात जागांसाठी ९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यातील १४ अर्ज आतापर्यंत माघार झाले आहेत. महिला राखीवच्या दोन जागांसाठी ८ पैकी १ अर्ज, आर्थिक दुर्बलच्या एका जागेसाठी १० अर्जातून १,भटक्या विमुक्त एका जागेसाठी १८ अर्जातून २,अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी ११ अर्जातून २,

ग्रामपंचायत गटातील ६२ मधून ५ अर्ज तर व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी ११ अर्जातून २ जणांनी आतापर्यंत अर्ज माघार घेतली आहे. हमाल मापारी गटासाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उद्या शेवटच्या दिवशी किती माघारी होतात अन किती जण रिंगणात राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

निवडणूक अधिकारी कोण?

येथील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तहसीलदार प्रमोद हिले यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राधिकरणाने नियुक्ती केली आहे. मात्र चार दिवसापूर्वी त्यांची येथून बदली झाली असून नव्याने आबा महाजन येथे तहसीलदारपदी रुजू झाले आहेत. मात्र निवडणूक अधिकाऱ्याचा पदभार कुणाकडे हे अद्याप अस्पष्ट असल्याने या पुढील काळात कोण निवडणुकीचे कामकाज पाहणार याकडे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT