minor girl wedding esakal
नाशिक

नाशिक : आदिवासी अल्पवयीन मुलीचा विवाह

बालविकास प्रकल्पाधिकाऱ्यांनी रोखला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील बहीण-भावाचा विवाह एकाच मांडवात होणार होता. पण दहावीत शिकणाऱ्या मुलीचे वय सोळा वर्षाचे आहे म्हटल्यावर त्र्यंबकेश्‍वर बालविकास प्रकल्पाधिकारी भारती गेजगे आणि त्यांचे सहकारी पोलिसांसह त्या कुटुंबाच्या निवासस्थानी आज (ता.२५) सकाळी साडेसातला पोचले. विवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबीयांना प्रकल्पाधिकाऱ्यांनी अल्पवयात विवाह केल्याने काय परिणाम होतात याबद्दलची माहिती दिली. अडीच तासाच्या समुपदेशानंतर अखेर कुटुंबाने वऱ्हाड नेण्यासाठी आलेल्यांना ‘आमच्या मुलाचा आम्ही विवाह करणार आहोत, मुलीचा विवाह करणार नाही,’ असा निरोप दिला.

विवाहाच्यानिमित्ताने पाहुणे येण्याच्या अगोदर मोकळ्यापणाने संवाद व्हावा, यासाठी सकाळची लवकर वेळ निवडण्यात आली होती. संवादावेळी विवाह होणारी मुलगी खूप चिडलेली होती. पहिल्यांदा तिची समजूत घालण्यात आली. तसेच तिच्यासह कुटुंबीयांना अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याने कुपोषणापर्यंतच्या गंभीर समस्यांना कसे सामोरे जावे लागते इथंपर्यंतची शास्त्रीय माहिती देण्यात आली. मग ती मुलगी काहीशी शांत झाली. कुटुंबीयांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्‍नांना प्रकल्पाधिकाऱ्यांनी उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. नाशिकमधील वात्सल्य संस्थेत येणाऱ्या अनुभवाची माहिती प्रकल्पाधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिली. कुटुंबाला सामाजिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रश्‍नांना सामोरे कसे जावे लागते हेही सांगण्यात आले.

कुटुंबाने दिली लेखी हमी

प्रकल्पाधिकारी आणि इतरांनी दिलेल्या माहितीनंतर कुटुंबीय अल्पवयीन मुलीचा विवाह करणार नाही या निर्णयाप्रत पोचले. एवढेच नव्हे, तर आम्ही मुलीचा विवाह करणार नाही, अशी लेखी हमी त्या कुटुंबाने प्रकल्पाधिकाऱ्यांना दिली आहे. विवाह रोखलेली मुलगी दहावीत शिकत असताना आता तिला दहावीची परीक्षा देणे शक्य होणार आहे.

एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्वीप्रमाणे किशोरवयीन मुलींचे मेळावे आता त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात पुन्हा सुरु करण्यात येतील. मासिक बैठकी घेण्यात येतील. किशोरवयीन मुलींना कृती कार्यक्रम निश्‍चित करून देत त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. मुली मोकळ्यापणाने बोलायला लागतील. त्यांना विकासाचा मार्ग दिसण्यास मदत होईल आणि त्यातून बालविवाहाचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होईल.

- भारती गेजगे, बालविकास प्रकल्पाधिकारी, त्र्यंबकेश्‍वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

आजचे राशिभविष्य - 15 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT