Death News esakal
नाशिक

Nashik News: सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना निफाड तालुक्यातील भरवस येथे घडली. वैष्णवी किरण वावधाने (वय २१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

या प्रकरणी विवाहितेचा वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सासरच्या पाच जणांवर लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Married woman commits suicide after being harassed by father in law Nashik News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वैष्णवी हिचे भरवस (ता. निफाड) येथील किरण प्रभाकर वावधाने यांच्याशी ८ मे २०२० मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिने सुरळीत गेले. त्यानंतर मात्र सासरच्या मंडळींकडून वैष्णवी हिस शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरवात झाली.

याबाबत तिने वडिलांनादेखील सांगितले होते. परंतु अपत्य प्राप्तीनंतर सर्व सुरळीत होईल, अशी समजूत तिच्या आई-वडिलांनी घातली. अपत्य प्राप्तीनंतर देखील त्रास कमी न झाल्याने वैष्णवी ही सहा महिने माहेरी होती. वैष्णवीचे मामेसासरे कैलास कुयटे (रा. दावचवडी) यांनी मध्यस्थी करत वैष्णवीला सासरी पाठविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून शिवीगाळ, मारहाण होत असल्याने तिने जाचाला कंटाळून माधव गणपत मानकर यांचे शेत गट नंबर ३९ मधील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, असे वैष्णवीचे वडील भारत रामनाथ बोचरे (रा. देवगाव) यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार पती किरण प्रभाकर वावधाने, सासू जनाबाई प्रभाकर वावधाने, सासरा प्रभाकर गणपत वावधने, दिर सुनील प्रभाकर वावधाने, जाव प्रतीक्षा सुनील वावधाने या सासरच्या मंडळींविरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपविभागीय अधिकारी नीलेश पालवे यांनी घटनास्थळी भेट देत तपास अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सहाय्यक पोलिस निरीशक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मारुती सुरासे, किशोर लासुरकर तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT