येवला (जि. नाशिक) : विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी बुधवारी (ता. १) पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपात येथील ३२४ कामगार सहभागी झाल्याने कांदा लिलाव बंद होते. शासनाने माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावावेत, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. (Mathadi Worker Strike Symbolic strike of Mathadi workers and onion auction closed at yeola nashik news)
माथाडी कामगारांच्या राज्यस्तरीय लाक्षणिक संपाचा फटका येथील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाही बसला. माथाडी कामगार संपात सहभागी झाल्याने येवला व अंदरसूल येथील बाजार समितीच्या आवारातील कांदा लिलाव होऊ शकले नाहीत.
माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना व पुनर्रचित सल्लागार समितीवर कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणुक करावी, विविध माथाडी मंडळाची पुनर्रचना करून पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करावी,
माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेतील त्रुटी दूर करण्यासंबंधी विशेष समिती गठीत करावी, माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणाया गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करून पोलिस संरक्षणाचे नवीन परीपत्रक पोलिस यंत्रणेकडून काढण्यासंबंधी कार्यवाही व्हावी.
विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे, शासनाच्या कामगार विभागाच्या १२ नोव्हेंबर २००८ च्या आदेशास नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यां मधील व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने माथाडी व मापाडी कामगारांना २००८ पासून डिसेंबर २२ अखेर १२६ कोटी रुपये लेव्हीची रक्कम व्यापाऱ्यांकडून मिळालेली नाही.
'त्यामुळे कामगारांना लेव्हीच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांचे फायदे मिळत नसल्याने प्रलंबित लेव्हीच्या प्रश्नाची सोडवणुक करण्यात यावी, शासन निर्णयानुसार खासगी बाजार समितीमधील माथाडी अनुषंगिक कामे बाजार समितीचे परवानेधारक व मंडळाच्या नोंदित कामगारांना कामे मिळावीत.
शासनाच्या पणन विभागाच्या १२ जून २०१२ च्या परिपत्रकातील माथाडी व मापाडी कामगार भरतीबाबत बाजार समितीत वार्षिक एक लाख क्विंटल शेतमाल आवकेस सात हमाल व तीन मापाडीच्या कामगारविरोधी आदेश रद्द करण्यात यावा अथवा सदर अटी शर्तीमध्ये योग्यतेबदल करण्यात यावे.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
बाजार समितीत राजीनामा दिलेल्या माथाडी व मापाडी कामगारांच्या जागी नवीन कामगारास बाजार समितीचा परवाना घेण्याबाबत येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यात यावी. शासनाच्या नवीन धोरणानुसार सुधारित थेट वाहतूक पद्धतीप्रमाणे जिल्ह्यातील १३ शहरांतील शासकीय धान्य गुदामामध्ये येणार नसल्याने ही गोदामे बंद होणार आहेत.
त्यामुळे तेथील कामे करणारे माथाडी कामगार बेरोजगार होणार असल्याने याबाबत योग्य ते धोरण निश्चित करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
येथे बुधवारी निवासी नायब तहसीलदार पंकज मगर यांना नाशिक जिल्हा माथाडी कामगार संघटनेचे चिटणीस जगदाळे, यशवंत बोराडे तसेच येथील माथाडी कामगार आसाराम गोविंद, वसंतराव झांबरे, ज्ञानेश्वर तवार, अण्णा रोठे, संदीप लहरे, संतोष देशमुख, अभिमन्यू तांदळे, अरुण ठाकरे, शांताराम कोटमे, संतोष सिरसाठ, अजय ढमाले, दिलीप गायकवाड, संतोष सातारकर, बबन सोळसे यांनी निवेदन देत माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.