नाशिक : सूरत येथील लालभाई स्टेडिअममध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (BCCI) झालेल्या वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतीम सामन्यात नाशिकच्या माया सोनवणेने रेल्वेविरुद्ध २ बळी घेतले. स्पर्धेत रेल्वेने विजेतेपद, तर महाराष्ट्राला उपविजेतेपद मिळाले. (Maya shines in BCCI womens T20 cricket tournament Maharashtra runner-up Nashik Sports News)
रेल्वेने अंतीम सामना ७ गडी राखून जिंकला. रेल्वेच्या बाद झालेल्या तीनपैकी दोन बळी मायाचे आहेत. मायाने अंतिम सामन्यात ३.१ षटकांत २२ धावा देत हे यश मिळवले. ९ चेंडू निर्धाव टाकलेत. त्याआधी पुदुचेरी येथील साखळी सामान्यात तिने चांगली कामगिरी केली. आंध्रप्रदेश आणि केरळविरुद्ध प्रत्येकी चार बळी घेतले. लेग स्पीन (Leg Spinner) गोलंदाजीने तिने स्पर्धेत एकुण ११ बळी घेतले आहेत. दरम्यान, अंतीम सामन्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधनाच्या ८४ धावांच्या जोरावर २० षटकात ४ बाद १६० धावा केल्या. उत्तरा दाखल रेल्वेने एस. मेघना व डी. हेमलताच्या अर्धशतकांमुळे १८.१ षटकात ३ बाद १६५ धावा करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील कामगिरीबद्दल मायाचे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे, संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.