satish kulkarani Google
नाशिक

अवास्तव बिल आकारल्यास टाळे ठोकू - महापौर सतीश कुलकर्णी

विक्रात मते

शहरातील रुग्णालयासंदर्भात काही दिवसात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहे. वोक्हार्ट रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी मोठे आंदोलन झाले. या पार्श्‍वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी रामायण बंगल्यावर बैठकीचे आयोजन केले होते.


नाशिक : मुंबई, पुणे या मोठ्या शहराप्रमाणे नाशिक शहरातदेखील कार्पोरेट रुग्णालये हवी आहे. परंतु, त्या रुग्णालय प्रशासनाने दर्जेदार सेवा देताना नफेखोरी करू नये, नियमात बिल आकारावे. अवास्तव बिल आकारून रुग्णांची पिळवणूक झाल्यास रुग्णालयाला टाळे ठोकू, असा इशारा महापौर सतीश कुलकर्णी यांनी गुरुवारी (ता. २७) दिला. (Mayor Satish Kulkarni warned to close the hospital which was charging exorbitant bills)


शहरातील रुग्णालयासंदर्भात काही दिवसात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहे. वोक्हार्ट रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी मोठे आंदोलन झाले. या पार्श्‍वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी रामायण बंगल्यावर बैठकीचे आयोजन केले होते. आमदार प्रा. देवयानी फरांदे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृहनेते सतीश सोनवणे, महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक बोधिकिरण सोनकांबळे, कार्पोरेट रुग्णालयांसाठी नियुक्त केलेले लेखा परिक्षक आदी उपस्थित होते. कोविड रुग्णांवर उपचार केला जात असताना काही कार्पोरेट कंपन्या आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे शहरात वैद्यकीय व्यावसायिकांना बदनामीला सामोरे जावे लागत आहे. या बदनामीमध्ये चांगले काम करणारे डॉक्टर विनाकारण भरडले जात आहेत. शहरातील कार्पोरेट हॉस्पिटल सेवा देण्यासाठी आले की रुग्णांची लूट करण्यासाठी आलेत, असा सवाल महापौर कुलकर्णी यांनी करताना थेट कारवाईचा इशारा दिला.


रामायण बंगल्यावर हेल्पलाइन
रुग्णालये व बिलासंदर्भात लेखापरीक्षक नियुक्त केले आहे. त्याचबरोबर आता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावरदेखील तक्रार नोंदविण्याची व्यवस्था असून, आता महापौरांच्या रामायण बंगल्यावर तक्रारींसाठी नव्याने यंत्रणा उभारली जाणार असल्याचे महापौर कुलकर्णी यांनी जाहीर केले.


महापौरांच्या सूचना
- मुख्यलेखा परिक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती.
- लेखापरीक्षण विभागामार्फत रुग्णांच्या बिलांची तपासणी करा.
- रुग्णालयांमधील मेडीकल स्टोअरवर नियंत्रण आणा.
- फार्मसी विद्यार्थ्यांच्या मदतीने औषधांची तपासणी करा.
- अन्न व औषध प्रशासनाकडून बिलांची तपासणी व्हावी.
- तक्रार असलेल्या रुग्णालयावर तातडीने कारवाई.


कार्पोरेट रुग्णालयांनी सेवा देताना अवाजवी बिले आकारू नये, अन्यथा तक्रारींची शहानिशा करून टाळे ठोकावे लागेल.
- सतीश कुलकर्णी, महापौर.

(Mayor Satish Kulkarni warned to close the hospital which was charging exorbitant bills)



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT