MBA admission  sakal
नाशिक

‘एमबीए’ प्रवेशासाठी नाशिक उपकेंद्रात चुरस

कॅपसह इन्स्टिट्यूशनल राउंडमध्येही इच्‍छुकांची लक्षणीय संख्या

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रांगणात ''पुम्‍बा''च्‍या माध्यमातून व्‍यवस्‍थापनशास्‍त्र शाखेचे शिक्षण दिले जाते आहे. याच धर्तीवर नाशिक उपकेंद्रांशी संलग्‍न एमबीए शिक्षणक्रम सुरु केला असून, त्‍यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यंदाच्‍या वर्षी कॅप राउंडसह इन्‍स्‍टिट्यूशनल राउंडमध्येही प्रवेशास इच्‍छुकांची संख्या लक्षणीय राहिली. त्‍यामुळे प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस बघायला मिळत आहे.

गेल्‍या २०१८ पासून नाशिक उपकेंद्राअंतर्गत एमबीए शिक्षणक्रमाला सुरवात केलेली आहे. साठ प्रवेश क्षमता असताना पहिल्‍या वर्षी सत्तावीस विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला होता. २०१९ मध्ये ३९ तर गेल्‍यावर्षीच्‍या प्रवेश प्रक्रियेत ५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले होते. यावर्षी देखील शंभर टक्‍के जागा भरल्‍या जाणार असल्‍याची स्‍थिती आहे.

विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, प्रवेशाचा कट-ऑफ उंचावत चालला आहे. यावर्षी पहिल्‍या कॅप राउंडमध्ये विद्यापीठांतर्गत ९१.५४ पर्सेंटाईल तर विद्यापीठेतर विद्यार्थ्यांचा ९५.६४ पर्सेंटाईल असा कट-ऑफ राहिला आहे. नाशिक उपकेंद्राचे समन्‍वयक डॉ.प्रशांत टोपे, व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य विजय सोनवणे यांच्‍यासह प्राचार्य डॉ. व्‍ही.बी. गायकवाड अशा मान्‍यवरांचे मार्गदर्शन या शिक्षणक्रमांना लाभते आहे.

शिक्षणादरम्‍यान उत्‍पन्न

शिक्षणक्रमाचा भाग म्‍हणून विद्यार्थ्यांना एन्‍ट्रासशिप पूर्ण करायची असते. यंदाच्‍या वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी पन्नास टक्‍के विद्यार्थ्यांना विद्यावेतनासह एन्ट्रासशिपची संधी उपलब्‍ध झालेले आहे. त्‍यामुळे शिक्षण घेत असताना या विद्यार्थ्यांना खर्च भागविणेदेखील शक्‍य झाले आहे. प्‍लेसमेंटच्‍या बाबतही आलेख उंचावत असल्‍याचे सांगण्यात येत आहे.

देशभरातून विद्यार्थी इच्‍छुक

‘पुम्‍बा’ शी संलग्‍न असल्याने नाशिक उपकेंद्रातील एमबीए शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी देशभरातून विद्यार्थी इच्‍छुक असल्‍याचे चित्र आहे. यावर्षी राज्‍यभरातील विविध ठिकाणांसह थेट नैनीतालहूनही एका विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज सादर केल्याची माहिती मिळत आहे. येथे मार्केटिंग, फायनान्‍स, मनुष्यबळ संसाधन (एचआर), ऑपरेशन ॲण्ड सप्‍लाय चेन मॅनेजमेंट, बिझनेस ॲनेलेटिक्‍स या विषयांमध्ये एमबीए शिक्षणक्रमाची संधी उपलब्‍ध करून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT