MBBS Admission : पुणे शहरात रविवारी (ता. २१) एमबीबीएस ॲडमिशन महाकुंभ होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन हाऊस ९९२, लोकमान्य टिळक रोड, दादावाडी, शुक्रवार पेठ, पुणे येथे सकाळी ११ वाजता महाकुंभ होणार आहे.
याच ठिकाणी पालकांना आणि विद्यार्थ्यांना महाकुंभसाठी नाव नोंदणी करता येणार आहे. महाकुंभ मोफत असून, एकाच छताखाली परदेशातील विविध नामांकित विद्यापीठाबद्दलची माहिती पालक आणि विद्यार्थी मिळणार आहे. (MBBS Admission Mahakumbh on Sunday in Pune nashik news)
त्याचबरोबर फी, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, राहण्याची व जेवण्याची सुविधा अशा अनेक मुद्द्यांबाबत माहिती मिळणार आहे. महाकुंभमध्ये डॉ. प्रवीण दोरखे (सल्लागार रेडिओलॉजिस्ट) रूबी मेडिकल सर्व्हिसेस, पुणे, डॉ. शैलेश कांचन पाटील सल्लागार फिजिशियन सह्याद्री हॉस्पिटल, पुणे,
डॉ. श्रेयश जुवेकर सल्लागार पॅथॉलॉजिस्ट, कोल्हापूर, डॉ. अमित बोराडे संस्थापक, फ्यूचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहेत. महाकुंभ आयोजनामागे फ्यूचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस या संस्थेचा मोलाचा वाटा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.