Drugs seized Crime Sakal
नाशिक

Nashik MD Drug Case: नाशिक बनतेय MDचा अड्डा? औद्योगिक वसाहतीतील गाळ्यांवर करडी नजर

सकाळ वृत्तसेवा

Nashik MD Drug Case : मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिकमधील एमडी ड्रग्जसचा कारखानाच उद्ध्वस्त केल्याने नाशिक पोलिसांची नव्हे तर नाशिककरांची झोप उडाली आहे.

नाशिक पोलिसांनीही शिंदे गावातील आणखी एका गाळ्यातून सहा कोटींचा सुमारे पाच किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केल्याने नाशिक एमडी ड्रग्जचा अड्डा तर नाही ना, असा प्रश्न होऊ लागला आहे.

दरम्यान मुख्य संशयित भूषण पानपाटील याचा मुंबई पोलिसांसह पुणे, नाशिक पोलिस कसून शोध घेत आहेत. (MD Drug Case Nashik becoming Capital for MD police watch slums of industrial estate)

गुरुवारी (ता.५) नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने वडाळागावात छापा टाकून ५४ ग्रॅम एमडीचा साठा जप्त केला होता.

मात्र त्याचवेळी मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिकरोड पोलिसांच्या हद्दीतील शिंदे गावात मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी छापा टाकून तब्बल ३०० कोटी रुपयांचा एमटीचा साठा जप्त करीत एमडी बनविणारा कारखानाच उद्ध्वस्त केला. या कारवाईमुळे नाशिक एमडीचा अड्डा असण्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईने नाशिककरांच्या चिंतेत भर पडली आहे. ड्रग्जचे उल्लेख झाला की मुंबई-पुण्याचे नाव घेतले जायचे. परंतु आता नाशिकमध्ये महागड्या एमडी ड्रग्ज्‌चा कारखाना सापडल्याने नाशिककरांचे डोळे विस्फारले आहेत.

१५ ते २० हजार रुपये ग्रॅमने विकले जाणारे एमडी ड्रग्जचे मार्केट नाशिकमध्ये फोफावले आहे. शहरातील उच्चभ्रू परिसरामध्ये असलेल्या हॉटेल्समध्ये हुक्का पार्लरमधून सुगंधित तंबाखूच्या नावाखाली बिनबोभाट एमडीचा वापर केला जातो.

पोलिस महासंचालक कार्यालयानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, त्याबाबत जाबही विचारण्यात आला आहे.

या घडामोडीनंतर एमडी ड्रग्जसह अंमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून अशाप्रकारे कारवाई सुरू राहील. या प्रकरणाचे पाळेमुळे खोदून काढून संशयितांना जेरबंद केले जाईल.

तसेच, शहरालगतच्या ग्रामीण भागात अशारितीने चोरी छुप्यारितीने असे उद्योग सुरू असतील तर शोधून काढले जाईल असे पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.

औद्योगिक वसाहती रडारवर

शिंदे गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर औद्योगिक वसाहत असून, याठिकाणी लहान-मोठे स्वरूपाचे उद्योग व्यवसाय सुरू आहेत. साकीनाका पोलिसांनी शिंदे गावातील औद्योगिक वसाहतीत सगळ्यात शेवटी असलेल्या श्री गणेशाय इंडस्ट्रीज या कंपनीवर छापा टाकला.

ही कंपनी भूषण पानपाटील याची असून तोच मुख्य सूत्रधार आहे. यामुळे नाशिक शहरातील अंबड, सातपूरसह शहरालगत नव्याने वसलेल्या औद्योगिक वसाहती शहर पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.

रासायनिक पदार्थ, द्रव्य बनविणाऱ्यासह औषधी कंपन्यांकडे शहर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. अनेक कंपन्यांची पोलिसांकडून झडतीसत्रही राबविल्याचे समोर येते आहे.

भूषण पानपाटील मुख्य सूत्रधार

साकीनाका पोलिसांनी ज्या श्री गणेशाय इंडस्ट्रीज कंपनी भूषण पानपाटील याची आहे. भूषण हा पुण्याच्या ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या ललित पाटीलचा भाऊ असल्याचे बोलले जाते.

नाशिकच्या कारखान्यात बनविण्यात येणारा एमडी ड्रग्ज भूषण स्वत: मुंबई आणि पुण्यात डिलिव्हर करीत असल्याचे समजते.

यासाठी तो मुंबईकडे जाताना टोलविरहित व चेकनाके नसलेल्या रस्त्यांचा वापर करायचा, असेही समजते. ललित व भूषण या दोघांच्या मागे राज्यभरातील पोलिस लागले आहेत.

विधानसभेतही गाजला होता ‘अमली’चा मुद्दा

‘सकाळ’मधून गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये ‘नशेचा बाजार’ ही अमली पदार्थ संदर्भातील मालिका प्रसिद्‌ध केली होती. या मालिकेची दखल थेट हिवाळी अधिवेशनात घेण्यात आली.

आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी उपस्थित केल्या नाशिकमधील महाविद्यालयीन तरुण अमली पदार्थांच्या विळख्यात अडकल्याचे सांगत ठोस कारवाईची मागणी केली. तेव्हापासून नाशिकमधील अमली पदार्थांचा मुद्दा चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT