Nashik MD Drug Case : सराईत गुन्हेगारांना एमडी ड्रग्ज पुरवणाऱ्यास जेरबंद करण्यात अखेर गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश आले आहे.
पकडलेल्या संशयित पुरवठादाराचे नाव अनंत जायभावे असून गुरुवारी (ता.१८) पाथर्डी शिवारात केलेल्या कारवाईनंतर तो फरारी झाला होता. मात्र पोलिसांनी काही तासांतच त्यास अटक केली. (MD drug supplier Anant Jaybhave arrested by police nashik news)
पाथर्डी शिवारात एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी (ता.१८) गुन्हे शाखेच्या युनिट एकने केलेल्या कारवाईत निखिल पगारे व कुणाल ऊर्फ घाऱ्या घोडेराव यांना अटक करताना इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यापैकी निखिल हा सराईत गुन्हेगार असून, त्याचा टिप्पर गँगशी संबंध आहे.
दरम्यान या संशयितांकडून एक लाख रुपये किंमतीचे २० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले होते. संशयितांना एमडी ड्रग्ज पुरविणारा संशयित अनंत जायभावे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त श्री. बच्छाव, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी विशेष पथकाला मार्गदर्शन केले.
यानंतर गुन्हे शाखा युनिट एकतर्फे संशयिताचा शोध सुरु होता. त्याच्या संदर्भातील माहिती अंमलदार राहुल पालखेडे यांना गुरुवारी (ता.१८) गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. संशयित अनंत जायभावे हा नाशिकरोडच्या बीएमएस मार्केट येथे असल्याचे कळाल्यानंतर अंमलदार पालखेडे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना सांगितले.
यानंतर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने शिताफीने अनंत सर्जेराव जायभावे (वय ३०, रा. स्वामी समर्थ नगर, जत्रा हॉटेलच्या मागे, आडगाव) याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने गुन्ह्या कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौकशीसाठी पथकाच्या ताब्यात
अटक केल्यानंतर पुढील चौकशीच्या अनुषंगाने अनंत जायभावेला अमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्या या चौकशीत आणखी काही खुलासे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.