Farmers tilling and plowing their fields with machines despite the increase in the rate of mechanized work for agriculture in various areas esakal
नाशिक

Nashik: यंत्राद्वारे शेती करणे दरवाढीमुळे कठीण; उत्पादन कमी अन्‌ खर्च वाढल्याने शेती व्यवसाय दुहेरी संकटात!

विजय पगारे

Nashik News : शेतीची विविध कामे करण्यासाठी बैलजोडीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच, मजुरीने न उरकणारी कामे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून बळीराजा मशागतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरसारख्या यंत्रांचा वापर करीत आहे.

सध्या डिझेलसह सर्वच प्रकारच्या इंधनाचे दर स्थिर असले, तरी शेतमालाला चांगला बाजारभावही मिळत नाही. त्यातच यांत्रिक कामांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने यंत्राद्वारे शेती करणे कठीण झाले आहे. (Mechanized farming difficult due to price hike Due to low production and increased costs agricultural business in double crisis Nashik news)

याशिवाय खर्च वाढलेला असतानाच त्या तुलनेत उत्पादन मात्र कमी होत असल्याने एकुणच शेती व्यवसाय दुहेरी संकटात सापडला आहे. इगतपूरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. मात्र, शेतकरी आता पर्यायी पिकांची लागवड करीत आहेत.

काही मोजके शेतकरी मात्र आजही बैलजोडीद्वारे शेतीची कामे करून घेत आहेत. काही वर्षांपासून सालगड्यांच्या मजुरीत वाढ झाल्याने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर सुरू झाला.

त्यातच अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे शेतातून अधिक उत्पन्न मिळत नसल्याने बळीराजाचे बजेट कोलमडले आहे. बळीराजाला शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. मात्र, नैसर्गिक संकटे दरवर्षीच येत असल्याने शेतीचे गणित एकदमच बिघडत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यातच मजुरीचे वाढते दर, उत्पादन कमी व खर्च मात्र अधिक अशा दुहेरी संकटात शेतीव्यवसाय सापडला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे. मागील वर्षभरापासून शेतीची अर्थव्यवस्था बिघडली आहे. सध्या मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना यंत्रांवर अवलंबून रहावे लागत आहे. यामुळे अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत आहे.

"बैलजोडीच्या मदतीने शेती करावी, तर एका जोडीची किंमत लाखाच्या घरात आहे. यंत्राद्वारे शेती करावी, तर इंधनांचे दर, मजूरी, महागडी जंतूनाशक औषधे, खते आदींच्या किमती शेतीला परवडण्यासारख्या नाहीत. पावसाचा अनियमितपणा, वातावरणातील बदलांमुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेती करणे आता कठीण होत आहे." -शांताराम शेलार, शेतकरी, त्रिंगलवाडी (ता. इगतपुरी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT