Nitin Gadkari esakal
नाशिक

Nashik: अंजनेरी-ब्रह्मगिरी रोप-वे स्थलांतरणविषयी नाशिकच्या खासदारांना भेटा; संदीप भानोसेंना गडकरींची सूचना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अंजनेरी-ब्रह्मगिरी रोप-वे इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी नाशिकच्या खासदारांना भेटावे. नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिल्यावर त्यांनी ही सूचना केल्याचे डॉ. संदीप भानोसे यांनी सांगितले.

श्री. गडकरी यांच्या भेटीवेळी पर्यावरणप्रेमी मनीष बाविस्कर, जयेश पाटील, हेमंत कोलते उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले. (Meet Nashik MP on Anjaneri Brahmgiri rope way migration Gadkari suggestion to Sandeep Bhanose Nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खासदारांनी मागणी केल्याने उपक्रमाला मंजुरी दिली आहे. अंजनेरीच्या जैवविविधता आणि ब्रह्मगिरीचे पावित्र्य राखण्यासाठी हा रोप-वे नाशिक अथवा इतरत्र करण्याच्या पर्यावरणप्रेमींच्या मागणीसाठी खासदारांना भेटायला हवे, असे सांगून श्री. गडकरी यांनी हा विषय खासदारांकडे सोपविला.

डॉ. भानोसे म्हणाले, की खासदारांनी मागणी केली असली, तरीही स्थानिक आणि ग्रामस्थांचा त्यास विरोध आहे. हे सांगितल्यावर त्यासाठी खासदारांनी मला भेटायला हवे, असे मंत्र्यांनी सांगितले.

तसेच, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांची बैठक घेऊन निर्णय कळवायचा आहे. पण, पर्यावरणप्रेमींच्या मागणीचा खासदार विचार करतील काय, असा प्रश्‍न आहे. तसे न घडल्यास पर्यावरणप्रेमींना न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT