All office bearers and citizens releasing a balloon with Jarange-Patil's photograph in the air on Sunday in the wake of Manoj Jarange-Patil's meeting on Wednesday by Igatpuri Taluka Sakal Maratha Samaj. esakal
नाशिक

Manoj Jarange Patil Sabha: शेणित फाटा येथे 101 एकरावर बुधवारी सभा! सभेची तयारी पूर्णत्वाकडे

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : सकल मराठा समाजातर्फे शेणित फाटा (ता. इगतपुरी) येथे १०१ एकर क्षेत्रावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या बुधवारी (ता. २२) होणाऱ्या जाहीर सभेचे नियोजन पूर्ण झाले आहे.

इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यातून सभेसाठी येण्याचे नियोजन सुरू आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव या सभेसाठी येणार असून, येण्याच्या मार्गांवर विविध प्रकारच्या सोयी-सुविधा करण्यात येतील. (Meeting on Wednesday at 101 Acres in Shenit Phata manoj jarange patil Meeting preparations nearing completion nashik)

शेणित येथील नियोजित सभास्थळावरून मनोज जरांगे-पाटील यांचे छायाचित्र असलेला बलून रविवारी (ता. १९) सोडण्यात आला. सभेच्या दृष्टीने आर्किटेक्ट प्लॅन करण्यात आला असून, नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडणार आहे.

जवळपास ३०० फुटी रॅम्प आणि १० फूट उंच स्टेज तयार करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची १० बाय १० फूट व ११ फूट उंच मूर्ती आणि जरांगे-पाटील हे स्टेजवर राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

महिला विभाग, स्वच्छतागृह व्यवस्था, आरोग्य विभाग, पाणी, नाश्ता व स्टॅाल याबाबतचे सर्व नकाशे तयार असून, त्यानुसार कामे पूर्णत्वाकडे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Starlink India: इलॉन मस्क यांचं स्टारलिंक भारतात इंटरनेट क्षेत्रात करणार धमाका? ट्रम्प यांच्यासह भारत सरकारचे संकेत

DY Chandrachud: आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी चंद्रचूडांच्या पिठासमोर होण्याची शक्यता मावळली, आता...

Latest Maharashtra News Live Updates : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता नव्या बेंचकडे जाण्याची शक्यता

"आम्हाला कधीच मूल नको हवं होतं" लवकरच आई होणाऱ्या अभिनेत्रीच्या दाव्याने सगळ्यांना बसला धक्का ; म्हणाली...

Devendra Fadnavis: फडणवीसांनी दिलेले आश्वासन अपूर्णच...

SCROLL FOR NEXT