mega block  esakal
नाशिक

Central Railway Mega Block : मध्य रेल्वेतर्फे आजपासून Mega Block; जाणुन घ्या

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा स्थानकादरम्यानचा कर्नाक पूल पाडण्यासाठी मुंबई मंडळ आणि मध्य रेल्वेने १९ आणि २० नोव्हेंबरला २७ तासांचा मेगा ब्लॉक होणार आहे.

हा मेगा ब्लॉक मुख्य वाहिनीवर १७ तासांचा, हार्बर मार्गावर २१ तासांचा आणि मेल एक्सप्रेस कोचिंग डेपोच्या यार्ड लाइनवर २७ तासांचा असेल. मुख्य वाहिनीवरील १७ तासांचा हा ब्लॉक सीएसएमटी ते भायखळादरम्यान १९ नोव्हेंबरला रात्री अकराला सुरू होऊन २० नोव्हेंबरला दुपारी चारला संपेल. (Mega Block by Central Railway from today Nashik News)

याचप्रमाणे, हार्बर मार्गावरील २१ तासांचा ब्लॉक सीएसएमटी ते वडाळादरम्यान १९ नोव्हेंबरला रात्री अकराला सुरू होऊन, २० ला रात्री आठला संपेल. म्हणजेच मेनलाइन आणि हार्बर मार्गावरील गाड्यांची संपूर्ण वाहतूक ब्लॉक सुरू झाल्यानंतर क्रमशः १७ आणि २१ तासांनंतर सुरळीत होईल. उर्वरित, मेल एक्सप्रेस यार्डलाईनची वाहतूक २७ तासांनंतर म्हणजेच २१ नोव्हेंबरच्या पहाटे दोनला सुरू होईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी मेनलाईनवर भायखळा, परेल, कुर्ला, दादर या स्थानकातून ठाणे, कल्याण तसेच कर्जत-कसारा या स्थानकादरम्यान लोकल ट्रेन चालवल्या जातील.

याशिवाय, हार्बर मार्गावर वडाळा ते पनवेल आणि गोरेगाव या स्थानकादरम्यान लोकल ट्रेन चालवल्या जातील. या गाड्या चालवत असताना भायखळा, परेल, दादर, कुर्ला आणि वडाळा स्टेशनवर ट्रेन रिव्हर्सल साठी फलाटांची संख्या मर्यादित असल्याने, लोकल ट्रेन्स या कमी फ्रिक्वेन्सीनी चालविल्या जातील. त्यामुळे प्रवाशांनी त्या स्टेशनवर अनावश्यक गर्दी करू नये, अशी विनंती रेल्वेने केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉकचा प्रभाव असलेल्या विभागामध्ये अतिरीक्त बस सोडण्यासाठी संबंधित महापालिकाना विनंती करण्यात आली आहे.

वाहतुकीला होणारी अडचण कमी करण्यासाठी भुसावळ-मनमाड- नाशिक- इगतपुरी- मुंबई मार्गावरील १८ मेल एक्स्प्रेसच्या जोड्या रेल्वेने रद्द केल्या आहेत. याशिवाय ६८ मेल एक्स्प्रेस या दादर, पनवेल, पुणे आणि नाशिक या स्थानकात शॉर्ट ओरिजिनेट आणि शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत.

कोणत्या गाड्या रद्द व शॉर्ट टर्मिनेशन आहेत आदीसंदर्भात संपूर्ण माहिती ही सेंट्रल रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट cr.indianrailways.gov.in वर तसेच सेंट्रल रेल्वेच्या सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी मुख्य स्थानकात अतिरिक्त टिकट रिफंड काउंटर्स उघडण्यात येतील तसेच हेल्पडेस्कही लावण्यात आले आहेत. प्रवाशांनी ब्लॉकच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपला प्रवास सुरू करण्याअगोदर एकदा आपल्या रेल्वेगाड्यांची स्थिती वा स्टेटस चेक करावा, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT