NMC Nashik News esakal
नाशिक

SAKAL Exclusive: देवळालीकरांच्या सुविधा वाढतील, मात्र कराचा बोजा! NMCची हद्द वाढून पायाभूत सुविधांवर ताण

विक्रांत मते

SAKAL Exclusive : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा नाशिक महापालिकेत समावेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रक्रियेनंतर नाशिक महापालिकेची भौगोलिक हद्द वाढण्याबरोबरच पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होणार आहे, तर कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना अधिक कर मोजावा लागणार आहे.

परंतु दुसरीकडे पायाभूत सुविधादेखील वाढणार आहे. (Merger of Deolali Cantonment to nmc deolali people facilities will increase tax burden Increased NMC limits put strain on infrastructure nashik)

देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्ड (कटक मंडळ) लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवळाली कटक मंडळाला लागून भगूर नगरपालिका व नाशिक महापालिका आहे.

परंतु भगूर नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने देवळाली कटक मंडळाचा निधी भगूरच्या पायाभूत सुविधांवरच खर्च होण्याची भीती आहे. त्यामुळे नाशिक महापालिका हद्दीतच देवळाली कटक मंडळाचा समावेश होईल, हे जवळपास निश्चित झाले आहे.

देवळालीचा नाशिक महापालिकेत समावेश झाल्यानंतर त्याचे महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतील. एकीकडे भौगोलिक हद्द वाढणार असली तरी पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होईल.

देवळाली कटक मंडळाच्या हद्दीतील नागरिकांना कराचा बोजा सहन करावा लागेल. परंतु, त्याची झळ तत्काळ बसणार नाही. नियमाप्रमाणे पाच वर्षे कर लागू होणार नाही. पाच वर्षानंतर मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या वार्षिक कर पात्र मूल्यावर २५ टक्के कर आहे.

त्यानंतर निवासी क्षेत्रासाठी ७३ टक्क्यापर्यंत, तर अनिवासी क्षेत्रासाठी ८२ टक्क्यापर्यंत कर आकारणी होईल. देवळालीकरांना कर वाढी व्यतिरिक्त अन्य कुठलीच झळ बसणार नाही. परंतु नाशिक महापालिकेच्या क्षेत्रात वाढ झाल्यानंतर पायाभूत सुविधा पुरविताना कसरत करावी लागणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

देवळाली समावेशानंतर होणारे परिणाम

- महापालिकेचे क्षेत्र भगूर (विजय नगर) या ग्रामीण भागापर्यंत विस्तारेल.
- तेरा हजार एकर क्षेत्र वाढणार.
- महापालिका मुख्यालय ते भगूर २२ किलोमीटर अंतर.
- पाऊण लाखांनी लोकसंख्या वाढणार.
- रस्ते, ड्रेनेज, आरोग्य व वैद्यकीय सुविधा, दिवाबत्ती सुविधा पुरविणे बंधनकारक.
- महापालिकेला शाळा, अंगणवाडी वाढणार.
- दोन विभागीय कार्यालये वाढणार.
- नगरसेवकांच्या संख्येत दोनने वाढ.
- दारणा धरणात पाणी आरक्षण वाढणार.
- जलशुद्धीकरण केंद्र व मलशुद्धीकरण केंद्र वाढवावे लागणार.
- वाढत्या सुविधांच्या अनुषंगाने पदांचा नवा आकृतिबंध.
- देवळालीच्या कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे लागणार.
पाणीपट्टी निवासी एक हजार लिटरला पाच व वाणिज्य वापरकरिता २२ रुपये

देवळाली कॅन्टोन्मेंट कर स्थिती

- एकूण क्षेत्रफळ- १३ हजार एकर
- एकूण लोकसंख्या- ५४०४७
- निवासी मालमत्ता- १४ हजार
- अनिवासी मालमत्ता- १४००
- घरपट्टी- वार्षिक कर पात्र मूल्यावर- २५ टक्के.
- पाणीपट्टी- एक हजार लिटरला ४.८० रुपये (निवासी)
एक हजार लिटरला ३० रुपये (अनिवासी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT