नाशिक : येथील विशाल सटले याने स्नॅपचॅट या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग ॲपमधील बग (तांत्रिक चूक) शोधत ती कंपनीला लक्षात आणून दिली आहे. यासंदर्भात ॲप विकसकांकडून तांत्रिक चूक स्वीकारल्याबाबतचा ई-मेल विशालला प्राप्त झाला आहे. विशाल हा मेट भुजबळ नॉलेज सिटी येथील पदविका अभ्यासक्रमातील तृतीय वर्षातील (आयटी) विद्यार्थी आहे. (MET College student Vishal Satle discovered bug in Snapchat app Nashik News)
मेट पॉलीटेक्निकचा विद्यार्थी असलेला विशाल हा सामंजस्य करारांतर्गत सायबर संस्कार या सायबर सुरक्षा देणाऱ्या नामांकित संस्थेत इंटर्नशिप करत आहे. याअंतर्गत त्याने सुरक्षेच्या दृष्टीने स्नॅपचॅटमधील महत्त्वाचा बग शोधण्याची कामगिरी करून दाखवली आहे. सायबर संस्कारचे संचालक तन्मय दीक्षित यांचे त्याला सहकार्य लाभले. विशालच्या कामगिरीबद्दल मेट भुजबळ नॉलेज सिटीचे विश्वस्त समीर भुजबळ, प्राचार्य डॉ. राजेंद्र नारखेडे, विभागप्रमुख संजीव पाटील, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. उमेश पाठक, प्रा. अनिल गोसावी आदींनी अभिनंदन केले आहे.
असा होता बग
या बग (तांत्रिक चूक) मुळे समोरील वापरकर्त्याने पाठवलेला फोटो हा स्क्रीन शॉटद्वारे आपल्याकडे ठेवता येऊ शकत होता. याबद्दल समोरील व्यक्तीला कल्पना नसल्याने, यातून गोपनीयता (प्रायव्हसी) अटी-शर्ती बाधित होत होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.