Nashik News : येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीतर्फे (मेटा) जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकामच्या कार्यरत गट अ, ब, क संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक तथा अर्हताकारी परीक्षा घेण्यात येतात. (META exams now through TCS nashik news)
या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून घेण्यासाठी सरकारने मान्यता दिली. ‘मेटा’तर्फे २०१६ पर्यंत लेखी व प्रात्यक्षिक स्वरुपात ‘ऑफलाइन' परीक्षा व्हायच्या.
त्यात बदल समाविष्ट करण्यासह अधिक पारदर्शकता आणण्यासाठी २०१७ पासून परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने लेखी ऑनलाइन स्वरुपात घेण्याचा निर्णय झाला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आताच्या ऑनलाइन परीक्षेसाठी टीसीएस-आयओएन कंपनीने दिलेल्या दरामध्ये १५ टक्के व कर यासह सरसकट वाढ करुन ‘मेटा’ने उमेदवारांकडून परीक्षा शुल्क निश्चित करायचे आहे.
कंपनीचे दर १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत लागू असतील. परीक्षा शुल्क उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने स्विकारले जातील. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सरकारचा अथवा विभागाचा एक प्रतिनिधी उपस्थित राहील.-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.